esakal | मुंबईत लॉकडाऊनमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 'त्या' मुलाला मिळाला जमीन, कोर्टानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण...
sakal

बोलून बातमी शोधा

depression

गेल्या तब्बल ३ महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करत आहे. तर राज्यात कोरोनाग्रस्तांनी ९० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र कोरोनाचं संकट आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर मुंबई उच्च न्यायालयानं आज एक महत्वाचं विधान केलंय. 

मुंबईत लॉकडाऊनमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 'त्या' मुलाला मिळाला जमीन, कोर्टानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: गेल्या तब्बल ३ महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करत आहे. तर राज्यात कोरोनाग्रस्तांनी ९० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र कोरोनाचं संकट आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर मुंबई उच्च न्यायालयानं आज एक महत्वाचं विधान केलंय. 

काही दिवसांपूर्वी एका २७ वर्षीय युवकानं मुंबईत ३ पोलिसांवर हल्ला केला होता. लॉकडाऊनच्या काळातही तो  मास्क न घालता बेकायदेशीरपणे रस्त्यावर फिरत होता असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये उदासिनतेचं वातावरण निर्माण झालंय तसंच लोकं लॉकडाऊनला कंटाळले आहेत असं मत  या युवकाला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. 

हेही वाचा: बापरे! तब्बल 'इतके' टक्के ग्राहक शॉपिंगला उत्सुक नाहीत; ग्राहकांच्या मनात बसली कोरोनाची भीती 

८ मे ला करूण नायर नावाचा २७ वर्षांचा युवक मारिन ड्राईव्हला पोलिसांना बेकायदेशीरपणे फिरताना आढळला होता. त्यानं मास्कही घातला नव्हता. पोलिसांनी अधिक विचारपूस केल्यामुळे त्यानं पोलिसांवर हल्ला केला होता. मात्र या युवकावर याआधी असा कुठलाही गुन्हा दाखल नाही असं त्याच्या वकिलांकडून न्यायालयाला पटवून देण्यात आलं त्यामुळे कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला.  

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डांगरे यांनी या युवकाला जामीन देताना काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. 'करूण नायर हा युवक त्याच्या वयक्तिक कारणांमुळे विचलित होता आणि त्यामुळेच त्याच्या हातून हा गुन्हा घडला असावा' असं कोर्टानं म्हंटलंय. 

हेही वाचा: निर्बंध शिथील झाली... दुकाने ऊघडली, पण फॅशन स्ट्रीट सुना-सुनाच...

"मुंबईत सर्व गोष्टींसाठी बंदी घालण्यात आली होती त्यामुळे पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची अतिरिक्त जबाबदारी होती, त्याचा प्रचंड ताण पोलिसांवर होता. तसंच लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये उदासिनतेचं वातावरण निर्माण झालंय आणि लोकं लॉकडाऊनला कंटाळले आहेत" असंही मत कोर्टाकडून मांडण्यात आलंय.

environment of weariness and exasperation has created in mumbai said HC 

loading image