लॉकडाऊनमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं, धक्कादायक आकडेवारी आली समोर

मुंबईकरांचे कोरोनाकाळात मानसिक स्वास्थ्य बिघडले, लॉकडाऊनमध्ये दररोज तीन आत्महत्या
आत्महत्या
आत्महत्याsakal

मुंबई : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाले. दोन ते तीन महिने सलग घरातच राहिल्याने अनेकांची घुसमट झाली. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर झाल्याचे आपण पाहिले. त्यातूनच लॉकडाऊनच्या काळात दररोज तीन मुंबईकरांनी जीवनयात्रा संपवल्याचे मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

आत्महत्या
अहमदनगर : गावठी पिस्तूल विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. १८ ते ६० वयोगटातील एकूण प्रकरणांचा विचार केल्यास जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात एक हजार २८२ आत्महत्या झाल्या. म्हणजेच एका दिवसात सरासरी तीन व्यक्तींनी आत्महत्या केली. २०१९ साली हाच आकडा एक हजार २२९ इतका होता. त्यामुळे कोरोना काळात आत्महत्येचे प्रमाण चार टक्के वाढल्याचे स्पष्ट झाल्याचे मुंबई पोलिसांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

आत्महत्या
सिंबायोसिसतर्फे बुधवारपासून ‘सिम्बिथॉन २०२१’चे आयोजन

मुंबईतील एकूण आत्महत्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. २०१९ साली २६९, तर २०२० मध्ये ३१२ महिलांनी आत्महत्या केल्या. त्याउलट २०१९ साली ७१५, तर २०२० मध्ये ८१६ पुरुषांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. १८ ते ६० वयोगटातील महिलांमध्ये आत्महत्यांची संख्या १३ टक्क्यांनी घटली, तर पुरुषांमधील आत्महत्येची संख्या १४ टक्क्यांनी वाढली आहे. लॉकडाऊन काळात आर्थिक नुकसान, बेरोजगारी तसेच व्यसनामुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. परिणामी त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे दिसते. त्याउलट महिला मात्र अधिक कणखर असल्याने त्यांनी कुटुंबाला धीर देण्याचे काम केल्याने त्यांच्यातील आत्महत्येच्या प्रकरणामध्ये घट झालेली दिसते.

आत्महत्या
शिरोळ तालुक्यात भारत बंदला प्रतिसाद; क्रांती चौकात निदर्शने

ज्येष्ठ नागरिकांच्याही आत्महत्येत वाढ

लॉकडाऊनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्यांमध्ये तब्बल ६० टक्क्यांनी वाढ झाली. २०१९ मध्ये झालेल्या २३ आत्महत्यांवरून ज्येष्ठ नागरिकांचा हा आकडा २०२० मध्ये ३७ झाला आहे. त्यामुळे वर्षभरात ज्येष्ठ नागरिकांमधील आत्महत्यांमध्ये ३१ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. एकटेपणामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये दडपण वाढल्याने त्यांच्यातील आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. युसूफ माचीसवाला यांनी सांगितले; तर दुसरीकडे लहान मुलांच्या आत्महत्येत १३ टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

"लॉकडाऊन काळात लोकांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष झाले होते. ज्येष्ठ नागरिकांना कोविडचा जास्त धोका असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त निर्बंध लादण्यात आले. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर झाला."- जितेंद्र घाडगे, प्रमुख, द यंग व्हीसल ब्लोवर फाऊंडेशन

"लॉकडाऊन काळात मानसिक ताण वाढला होता. अनेक लोकांमध्ये मानसिक दडपण वाढल्याने आत्महत्यांचे प्रकरण वाढले आहे."- डॉ. युसूफ माचीसवाला, मानसोपचारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com