'त्याच्या'मुळे बावीस जण झाली होती क्वारंटाईन; 'तो' शरण आला आणि निगेटिव्ह सुद्धा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मे 2020

पोलिसांच्या ताब्यातून पळालेला कोरोनाबाधीत कैद्यामुळे तब्बल 22 कर्मचाऱ्यांना कोरोटाईन व्हावे लागले होते. पण अखेर तो कैदी पोलिसांना शरण आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर कैद्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

अंधेरी (बातमीदार) : पोलिसांच्या ताब्यातून पळालेला कोरोनाबाधीत कैद्यामुळे तब्बल 22 कर्मचाऱ्यांना कोरोटाईन व्हावे लागले होते. पण अखेर तो कैदी पोलिसांना शरण आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर कैद्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

मोठी बातमी ः सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करा; कामगार संघटनेची मागणी

बांगुर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या आरोपीला हाणामारीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सूनवत ठाणे मध्यवर्ती कारागृहात पाठविले. पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन ठाणे कारागृहात गेले. मात्र अधीक्षकांनी जागाच नसल्याचे करण देऊन आरोपीला पोलिस पथक घेऊन थेट तळोजा कारागृहात गेले. कैद्याला कारागृहात प्रवेश देण्यापूर्वीच कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपीची कोरोना चाचणी केलेली आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे त्याच पोलिस पथकाला कैद्याला घेऊन मुंबईच्या जेजे रुग्णालयात चाचणी करण्यासाठी नेण्यात आले. जेजे रुग्णालयाने चाचणीचा अवहाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आणि पोलीस पथकाची पायाखालची वाळूच सरकली.

मोठी बातमी ः नवी मुंबईकरांना दिलासा; रुग्णवाहिकेची समस्या सुटणार

कोरोनाबाधित आरोपीला जेजे रुग्णालयात जागा नसल्याने पोलिसांनी त्याला जीटी रुग्णालयात नेले. तो पर्यंत बरीच रात्र झाली होती. दरम्यान जीटी रुग्णालयाच्या बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून आरोपीने पलायन केले. कोरोनाचा रुग्ण रुग्णालयातून पाळल्याने शोधाशोध सुरू झाली. मात्र कोरोनामुळे घाबरलेला आरोपी दुसऱ्या दिवशी सकाळीच जीटी रुग्णालयाच्या गेटवरच उभा होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांनी त्याला पकडून रुग्णालयात नेले. त्याच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात पलायनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

मोठी बातमी ः कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन अत्यवस्थ; पर्यटकांच्या संख्येत 80 टक्क्यांची घट?

आरोपी उपचारानंतर बरा
दरम्यान, आरोपीच्या संपर्कात आलेले बांगुर नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, त्याला न्यायालयात नेणारे पोलिस पथक, वकील आदी 22 जणांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर हा आरोपी काही दिवसांनी चाचणी केल्यानंतर निगेटिव्ह आला. त्याला प्रथम आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी आरोपीला अधिक तापासाकरिता बांगुर नगर पोलिसांच्या स्वाधीन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive acused surrendered to police in mumbai