कोरोना पॉझिटिव्ह अधिकाऱ्याचा विधिमंडळात मुक्त वावर; स्वतःहून प्रवेशपासवर निगेटिव्ह मार्क केल्याची माहिती

तुषार सोनवणे
Tuesday, 8 September 2020

विधिमंडळामध्ये संसदीय कार्य विभागाचा एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती उशीरा प्राप्त झाली. तोपर्यंत तो अधिकारी विधिमंडळाच्या आवारात फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचे कामगाज रखडले होते परंतु , अखेर सहा महिन्यानंतर विधिमंडळाचे कामगाज सुरू झाले . परंतु या कामात कोणालाही कोरोनाची बाधा होऊ नये तसेच कोणी कोरोनाबाधित असेल तर त्यापद्धतीने खबरदारी घेण्यात येत होती. तरीही विधिमंडळातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. 

निलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून निवड,  निवडणुकीवर भाजपचा आक्षेप कायम

विधिमंडळामध्ये संसदीय कार्य विभागाचा एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती उशीरा प्राप्त झाली. तोपर्यंत तो अधिकारी विधिमंडळाच्या आवारात फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विधिमंडळाचे कामगाज सुरू होण्या आधी सर्व अधिकारी आणि आमदारांची चाचणी करण्यात आली होती परंतु या अधिकाऱ्यारा रिपोर्ट आलेला नव्हता, असं असूनही या अधिकाऱ्याने स्वतःच्या हाताने प्रवेश पास वर निगेटिव्ह असल्याचा मार्क केला. आणि विधिमंंडळ परिसरात मुक्तपणे वावरू लागला

या अधिकाऱ्याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. संबधीत अधिकारी मागील आठवड्यात आजारी असल्याची माहिती त्याच्या कार्यालयातील सहकार्यांने दिली आहे. या अधिकाऱ्याचा कोरोनारिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला घरीच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. प्रवेश पासवर स्वतःहून मार्क केल्यामुळे प्रशासकीय नियमांनुसार त्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

कंगनाला BMCने धाडली नोटीस; 24 तासात कागदपत्र सादर करण्याचे आदेश

विधानसभा अधिवेशन सुरू होण्याआधी भवनाच्या गेटवर आमदाराचा रिपोर्ट न आल्यामुळे गोंधळ झालेला पहायला मिळाला होता, माजी सभापती हरिभाऊ जावळे यांचा रिपोर्ट वेळेत न मिळाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Positive Officers free rein in the legislature; Self-negatively marked entry pass

टॉपिकस