esakal | माथेरानची निसर्गसंपदा बहरली
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

माथेरानची निसर्गसंपदा बहरली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माथेरान : निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केलेले ठिकाण म्हणून माथेरानला (Matheran) वेगळी ओळख आहे. त्यामुळे या स्थळाला पर्यटक (Tourists) वर्षभर भेट देतात पण या भूमीच्या पर्यावरणाचा (environment) समतोल राखण्यासाठी जैवविविधता असणे खूप गरजेचे आहे, हे नजरेसमोर ठेऊन येथील या खजिन्यावर रेनवो या संस्थेचे संचालक योगेश चव्हाण (Yogesh Chavan) तब्बल २० वर्षापासून अथक प्रयत्न करत आहेत. त्यांनी या काळातील नोंदी ठेवल्या आहेत. त्यानुसार माथेरानचे (Matheran) रान अनेक संकटे झेलूनही सक्षमपणे आजही उभे आहे. विशेष म्हणजे या काळात पशु पश्यांसह निसर्गसंपदेत सातत्याने वृद्धी होत आहे.असे सकारात्मक चित्र आहे.

हेही वाचा: चाकू, अडकित्याचा धाक दाखवत खंडणी उकळण्याचा प्रकार

माथेरानचे जंगल हे ७०० हेक्टरवर पसरलेले आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या किड्या-मुंग्यांपासून अनेक पक्षी तसेच प्राणी आणि अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. ऋतूनुसार येथे जैवविविधतेचे प्रकार आढळतात. संस्थेने दिवसा आणि रात्री आढळून येणाऱ्या सजीवांवर अभ्यास केला आहे. मुसळधार पावसाचा मारा सहन करणाऱ्या या भूमीने आपले अस्तित्व टिकवून आहे.

loading image
go to top