esakal | मुंबईतील रुग्णवाढीवर लक्ष; चार वेळा रुग्णसंख्या पाचशेच्या वर | corona
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

मुंबईतील रुग्णवाढीवर लक्ष; चार वेळा रुग्णसंख्या पाचशेच्या वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) नियंत्रणात आल्यानंतर मुंबईत रुग्णांचा (corona patients) आकडा चार वेळा पाचशेवर गेला आहे. गेल्या चार महिन्यांतील ही रुग्णवाढ म्हणजे तिसऱ्या लाटेचे (corona third wave) संकेत नाहीत. पुढील महिनाभर रुग्णसंख्या वाढीवर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यानंतर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेण्यात येणार असल्याचे पालिकेचे (bmc) अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (suresh kakani) यांनी सांगितले.

हेही वाचा: अपना बँकेच्या नव्या योजनात महिलांना प्राधान्य

दुसऱ्या लाटेनंतर नियंत्रणात आलेली कोरोनाची रुग्णसंख्या सध्या वाढत आहे. अडीचशेच्या आसपास असलेली संख्या आता ४५० ते ५०० वर गेली आहे. ११ जुलै ५५५, ८ सप्टेंबर ५३०, ३ ऑक्टोबर ५७०, तर ६ ऑक्टोबर ६२९ रुग्ण सापडले होते. त्यामुळे हे तिसऱ्या लाटेचे संकेत आहेत, असे म्हणता येणार नसल्याचे काकाणी यांनी सांगितले. नुकतेच गणेशोत्सवावरून परतलेल्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते. आगामी काळातही अनेक सण-उत्सव असल्याने किमान महिनाभर रुग्णसंख्येसह कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. त्यानंतर तिसऱ्या लाटेबाबत नेमके सांगता येईल, असेही काकाणी म्हणाले.

loading image
go to top