मुंबईतील 87 टक्के बेड्स रिक्त, 50 टक्क्यांहून अधिक व्हेंटिलेटर्स रिकामे

50 टक्क्यांहून अधिक व्हेंटिलेटर्स रिकामे, 99 % बालरोग आयसीयू रिक्त
corona hospital beds
corona hospital beds sakal media

मुंबई : कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा (corona second wave) तडाखा बसल्यानंतर  संपूर्ण मुंबईच्या रूग्णालयातील (Mumbai hospital) जवळपास 87 टक्के बेड्स रिक्त (beds vacant) आहेत. तर, जवळपास 50 टक्क्यांहून अधिक व्हेंटिलेटर्सही (ventilator) रिकामे आहे. त्यामुळे, ही एक दिलासादायक बाब जरी असली तरी मुंबई पालिका (bmc) तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. तिसऱ्या लाटेत (third wave) लहान मुलांना (child) सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली असली तरी दुसऱ्या लाटेत बालरोग आयसीयू 99 % रिक्त असल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवरुन स्पष्ट केले आहे. (corona second wave-Mumbai hospital-beds vacant-ventilator-bmc-nss91)

 मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार, एकूण 17,602 कोविड खाटांपैकी 15,043 खाटा सध्या रिकाम्या आहेत. तसंच गंभीर रुग्णांसाठी लागणाऱ्या 2,266 आयसीयू खाटांपैकी 1,471 खाटा रिक्त आहेत. तर, विशेष म्हणजे 1,292 व्हेटिंलेटर्सपैकी 783 व्हेटिलेटर्स रिक्त आहेत म्हणजेच जवळपास 50 टक्क्यांहून अधिक व्हेटिलेंटर्सही रिकामे आहेत. गंभीर आणि आयसीयूमध्ये असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने डॉक्टरांवरचा ताण कमी झाल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

corona hospital beds
माॅल आणि हाॅटेल बंद ठेऊन सरकार कोविडचा संसर्ग कसा रोखणार ? व्यापाऱ्यांचा सवाल

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची निच्चांकी नोंद मुंबईत होत आहे. रुग्णसंख्या 250 ते 300 च्या असल्याने बेड्सही रिक्त आहेत. रुग्णालये आणि जंबो कोविड केंद्रातील 87 टक्के बेड्स रिक्त असले तरी पालिकेचे प्रतिबंधात्मक प्रयत्न सुरु आहेत असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत 1 ऑगस्टपासून निर्बंधांवर शिथिलता आल्याने नागरिकांनी जर नियम पाळले नाहीत तर नियंत्रणात आलेली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुपांतर तिसऱ्या लाटेत होण्यास जास्त वेळ नाही लागणार असेही तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 ज्या देशांमध्ये लसीकरण पूर्ण झाले आहे तिथे ही तिसरी लाट आली असून आता रुग्णसंख्या वाढते आहे. पण, मृत्यूदर आणि रुग्णालयात दाखल होणार्यांची संख्या कमी आहे. पण, ज्या देशांमध्ये लसीकरण 15 टक्क्यांपेक्षा खाली आहे तिथे मृत्यूदर आणि बेड्स भरलेले आहे.

 महिन्याअखेरीस रुग्ण वाढण्याची शक्यता

 जर सर्व जगात तिसरी लाट पसरली आहे. मुंबईसह राज्यातील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यातून या महिन्याअखेरीस रुग्ण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे किमान 70 टक्के लोकांचा पहिला डोस झालेला आहे. दोन्ही डोस पूर्ण झालेले फक्त 15 ते 20 टक्के आहेत. त्यामुळे, मुंबईत आकडा पुन्हा वाढू शकतो.. ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नसेल तर त्यांना पुढे आजारांचे गंभीर स्वरुप दिसेल.  

corona hospital beds
माळशेज घाटात काचेचा स्काय वॉक बांधणार

जर सर्व जगाचे निरीक्षण केले तर तिथेही तिसरी लाट आली आहे. पण, गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. मुंबईत बऱ्यापैकी लसीकरण झाल्याने तिसऱ्या लाटेतील संसर्गाचा वेग सौम्य असू शकेल. पण, हे सर्व एकूणच नागरिकांच्या वर्तणुकीवर अवलंबून आहे असे मत टास्क फोर्स सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले आहे.

99 % बालरोग आयसीयू रिक्त

दरम्यान, मुंबईत सध्या बालरोग आयसीयू बेड्सची संख्या कमी गेली असून सद्यस्थितीत 39 बालरोग आयसीयू आहेत. त्यापैकी 38 रिक्त असून फक्त एकच बेड भरलेला असल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवरुन स्पष्ट होत आहे. तसंच, अर्भक आयसीयूही रिक्त असून 37 पैकी 8 भरलेले आहेत आणि 29 बेड्स रिकामे आहेत. 8,768 ऑक्सिजन बेड्सपैकी 1,092 भरलेले आहेत आणि 7 हजार 676 रिक्त आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com