esakal | आजपासून डहाणू-पनवेल, वसई-पनवेल मेमू सुरू | Railway update
sakal

बोलून बातमी शोधा

Memu Train

आजपासून डहाणू-पनवेल, वसई-पनवेल मेमू सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची परिस्थिती (corona situation) नियंत्रणात आल्याने आता विविध सेवा-सुविधा पूर्ववत होत आहे. शाळा, धार्मिकस्थळे खुले झाले. त्यानंतर अनेक कालावधीपासून बंद असलेल्या डहाणू-पनवेल, वसई-पनवेल मेमू (railway memu train) गाड्या सुरू करण्याची प्रवाशांकडून मागणी (commuters demand) केली जात होती. त्यानुसार पश्चिम रेल्वेने (western railway) (ता. ११) डहाणू-पनवेल, वसई-पनवेल मेमू गाड्या पुढील सूचनेपर्यंत धावणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: राज्यावर भारनियमनाचे संकट गडद

पनवेल-वसई ही मेमू कळंबोली, नवाडे रोड, तळोजा पंचनंद, निळजे, दातिवली, भिवंडी रोड, खारबाव, कामन रोड आणि जूचंद्र या स्थानकावर, तर डहाणू-पनवेल ही मेमू वनगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केळवे रोड, सफाळे, वैतरणा, विरार, नालासोपारा, वसई रोड, जूचंद्र, कामन रोड, खारबाव, भिवंडी रोड, दातिवली, निळजे, तळोजा पंचनंद, नवाडे रोड आणि कळंबोली या स्थानकावर थांबतील. या सर्व गाड्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून पुढील सूचना मिळेपर्यंत धावणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

loading image
go to top