मुंबईमुळे उल्हासनगरकरांचा ताप वाढला

मुंबईमुळे उल्हासनगरकरांचा ताप वाढला

 
उल्हासनगर : सव्वा महिन्यात उल्हानगरमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे शहरवासीय निर्धास्त होते. पण, या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. मुंबईत नोकरी करणाऱ्या ककर्मचाऱ्यांमुळे ही स्तिती निर्माण झाली आहे, असा दावा करून एका वकिलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा आजार रोखण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांची मुंबईतच राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. या अगोदर अशीच मागणी नवी मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

हे वाचा : राज्यात पुढील तीन दिवस पाऊस

मार्चमध्ये कोरोनाचा फैलाव सुरू झाला, त्यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे उल्हासनगर नगरमध्ये 20 एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांचा तक्ता निरंक होता. त्यानंतर 21 तारखेला मुंबई महापालिकेच्या खार रुग्णालयात काम करणारा आणि उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या वार्डबॉय कोरोना झाला. आयुक्त देशमुख यांनी त्याच्या कुटुंबियांना तात्काळ क्वारंटाईन केले. तसेच त्यांची कोरोना तपासणीही केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. पण, नंतर मुंबईतील येलोगेट येथील ठाण्यात कार्यरत असलेला पोलीसाला कोरोनाचा संसर्ग झाला. तर मंगळवारच्या रात्री उशिराने त्याच्या कुटुंबातील चौघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर भाभा रुग्णालयात असणारी आणि सुभाष टेकडी मध्ये राहणारी परिचारिका आता कोरोना पॉझिटिव्ह ठरली. त्यामुळे उल्हानगरवासींयांचा ताप वाढला आहे. 


या घटनांमुळे मुंबईत नोकरी करणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्याच शहरात राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ऍड. जय गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. या पुर्वी नवी मुंबई पालिकेनेही मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्यांची मुंबईतच राहण्याची व्यवस्ता करण्याची माणगी केली आहे. 

"कोविड-19' मध्ये 9 रुग्ण 
कोविड-19 रुग्णालयात उल्हासनगरातील पोलिस व त्यांच्या परिवारातील 4 असे 5 जण उपचार घेत आहेत. बदलापूर-2,कल्याण-1 असे 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षीका डॉ. भावना तेलंग यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com