
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, दक्षिण मुंबईतील एका केंद्रावर दहावीची परीक्षा देणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेले ३६ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा शोध आरोग्य विभाग व पोलिस घेत आहेत.
दहावीचा विद्यार्थी कोरोनाग्रस्त; आला ३६ जणांच्या संपर्कात...
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, दक्षिण मुंबईतील एका केंद्रावर दहावीची परीक्षा देणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेले ३६ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा शोध आरोग्य विभाग व पोलिस घेत आहेत.
ही बातमी वाचली का? होम कॉरंटाईनचा शिक्का असूनही 'तो' तीन तास रस्त्यावर भटकत होता!
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठांच्या मार्चमधील परीक्षा पुढे ढकलल्या. परंतु, शिक्षण विभागाने दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे जाहीर केले. बारावीची परीक्षा पूर्ण झाली; मात्र दहावीची परीक्षा सुरू होती. दहावीचा सोमवारी (ता. २३) होणारा अखेरचा पेपर मात्र पुढे ढकलण्यात आला. दक्षिण मुंबईतील एका नामांकित शाळेतील दहावीची परीक्षा देणारा एक विद्यार्थी कोरोना चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निदान झाले आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामाठीपुरा येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्याने शाळेपासून काही अंतरावरील केंद्रात दहावीची परीक्षा दिली. या केंद्रात ३५३ विद्यार्थी परीक्षा देत होते. एक वर्गात सुमारे २५ विद्यार्थ्यांची व्यवस्था होती.
ही बातमी वाचली का? जमावबंदीच्या आदेशाला हरताळ
कस्तुरबा रुग्णालयात या विद्यार्थ्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आढळले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याच्यासोबत दहावीची परीक्षा दिलेल्या अन्य विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे मागितली. शिक्षण विभागाने त्या परीक्षा केंद्रातील अन्य विद्यार्थ्यांची माहिती दिली. त्यावरून आरोग्य विभागाने या विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला आहे. परीक्षा केंद्र संचालकांनी आरोग्य विभाग आणि पोलिसांना तेथील अन्य विद्यार्थ्यांची माहिती दिली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितले.
Web Title: Corona Suffers Tenth Student South Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..