होम कॉरंटाईनचा शिक्का असूनही 'तो' तीन तास रस्त्यावर भटकत होता!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकार विविध उपाययोजनाद्वारे आळा घालण्याचे प्रयत्न करत आहे; मात्र असे असतानाच काही जणानांकडून त्याला छेद देण्यात येत आहे. असाच काहीसा प्रकार भाईंदर पूर्व येथील काशीनगर परिसरात परदेशातून परतलेल्या सक्तीचे होम कॉरंटाईन केलेल्या रुग्णाकडून झाल्याचे पाहायला मिळाले.

पालघर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकार विविध उपाययोजनाद्वारे आळा घालण्याचे प्रयत्न करत आहे; मात्र असे असतानाच काही जणानांकडून त्याला छेद देण्यात येत आहे. असाच काहीसा प्रकार भाईंदर पूर्व येथील काशीनगर परिसरात परदेशातून परतलेल्या सक्तीचे होम कॉरंटाईन केलेल्या रुग्णाकडून झाल्याचे पाहायला मिळाले.

ही बातमी वाचली का? एपीएमसीतील भाजीपाला मार्केट उद्यापासून बंद राहणार

हा रुग्ण काल रात्री तीन तास भाईंदर पूर्व परिसरातील रस्त्यावर निर्धास्त भटकत असल्याचे दिसून आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी अटक करून त्याला विलगीकरण कक्षात भरती केले. भाईंदर पूर्व येथील काशीनगर येथे राहणारा एक युवक नुकताच परदेशातून आला होता. त्याला होम कॉरंटाईन करून तसा शिक्का त्याच्या हातावर मारला होता; मात्र त्याने आपल्या हातावरील शिक्का मिटवून, काल रात्री 9 ते 11 भाईंदर पूर्व परिसरात फिरला. या कालावधीत त्याने दूध आणि किराणा सामान भाजीपाला आदी साहित्य घेतले.

ही बातमी वाचली का? जमावबंदीच्या आदेशाला हरताळ 

ही घटना समजताच शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी ही माहिती पालिका आणि पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून, भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट येथील विलगीकरण कक्षात दाखल केले. पोलिस आता त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quarantine in Bhayandar Wandered the streets for three hours