esakal | महापालिकेच्या 'या' रुग्णालयांत 22 हजार एलपीएम क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Plant

महापालिकेच्या 'या' रुग्णालयांत 22 हजार एलपीएम क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेत (Corona Third wave) प्राणवायूची कमतरता (Oxygen) भासू नये यासाठी पालिकेने (bmc hospitals) रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट (oxygen plant) उभारण्यावर भर दिला आहे. पालिकेच्या मोठ्या महत्वाच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आले असून त्यावर तब्बल 77 कोटी रुपये खर्च (expenses) केले आहेत.

हेही वाचा: BMC : मुंबईत कोरोना लसीकरण उद्या बंद

कोविड काळात आलेल्या पहिल्या लाटेत ऑक्सिजन खाटा मिळवण्यासाठी रुग्णांची फारच फरफट झाली. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला ही तारेवरची कसरत करावी लागली. मागणी जास्त असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजन खाटा मिळवण्यास उशीर देखील झाला,त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रोष देखील व्यक्त केला होता.

कोविड च्या दुसऱ्या लाटेत पालिका प्रशासनाने कोविड रुग्ण उपचार घेत असलेल्या महत्वाच्या व मोठ्या रुग्णालय तसेच कोविड केंद्रांमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेने एकूण 9 रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट बसवले. हे सर्व प्लांट सध्या सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नायर,कूपर,केईएम,सायन यासह सर्व महत्वाच्या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याची क्षमता ही 22,790 एलपीएम आहे. त्यावर पालिकेने 77 कोटी 15 लाख 6 हजार 802 रुपये खर्च केले आहेत. मे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी ऑक्सिजन प्लांटचे काम केले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

रुग्णालये क्षमता (एलपीएम मध्ये)

1)नायर 2×3000

2)कूपर 2×1300

3)भाभा (कुर्ला) 1×1300

4)व्ही.एन. देसाई 1×850

5)डॉ.आंबेडकर 2×850

6)केईएम 3×1500

7)सायन 2×1300

8)जीटीबी 2×1080

9)कस्तुरबा 1×1080

loading image
go to top