esakal | सीएसआर फंडामधून लसीकरणावर भर; 8 लाख डोस उपलब्ध होणार
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

सीएसआर फंडामधून लसीकरणावर भर; 8 लाख डोस उपलब्ध होणार

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (corona third wave) पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून (bmc) लसीकरण मोहीम (vaccination drive) अधिक जलद करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकारकडून (central government) पुरेसा लस साठा उपलब्ध होत नसल्यामुळे पालिकेला लसीच्या कमतरतेचा (less vaccines) सामना करावा लागत होता. यावर तोडगा म्हणून महानगरपालिका सीएसआर फंडातून (CSR Fund) लस साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न करत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी कोविड संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 15 ते 20 दिवसात जास्तीतजास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. मुंबईतील काही कंपन्यांकडून मिळून पालिकेला देणगी म्हणून सुमारे आठ लाख डोस मिळणार आहेत. या डोसचा वापर अधिक लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टी विभागात करण्यात येत आहे.

वरळी, परळ, शिवडी,प्रतीक्षा नगर, गोवंडी तसेच अन्य झोपडपट्टी परिसरात दाटीवाटीने वस्ती आहे.बहुतांश भागात बाजार असल्याने लोकांची सतत गर्दी आणि वर्दळ असते. या परिसरात लोकसंख्या अधिक असली तरी तुलनेने लसीकरण कमी झाले आहे. त्यामुळे सीएसआर फंडातून मिळणाऱ्या लसीच्या माध्यमातून या भागात लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत साधारणता दोन लाख लसी प्राप्त झाल्या आहेत.

हेही वाचा: मुंबईत महिलेच्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान

काही कंपन्यांनी सीएसआरद्वारे पालिकेला लस दान केली आहे, तर काहींनी लस देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या गोदरेज कंपनी, रिलायन्स आणि सीटी बँकेने लस दान केली आहे. सिप्ला, कोरकडूनही लसींचा साठा देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे जसलोक रुग्णालयासह अनेक कंपन्या आहेत ज्यांनी लस दान करण्यासाठी पुढे येत आहेत असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लसीच्या अभावामुळे लस न घेताच निराश होऊन मुंबईकरांना घरी परतावे लागते. त्यामुळे मुंबईकरांची ही अडचण लक्षात घेत काही कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत पालिकेला लस पुरविण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

loading image
go to top