esakal | तिसऱ्या लाटेचा बालकांना धोका; टास्क फोर्सची स्थापना
sakal

बोलून बातमी शोधा

तिसऱ्या लाटेचा बालकांना धोका; टास्क फोर्सची स्थापना

तिसऱ्या लाटेचा बालकांना धोका; टास्क फोर्सची स्थापना

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: तिसऱ्या लाटेत (Coronavirus Third Wave) लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स (Task Force) गठीत करण्यात आली आहे. यात 14 बालरोग तज्ञांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना (Preventive Measures) आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये 14 तज्ञ सदस्य (14 Member Panel) असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने त्याचे सदस्य सचिव आहेत. (Corona Third Wave dangerous for Children MVA Govt Established Special Task Force)

हेही वाचा: कल्याणमध्ये आलिशान 'रॉल्स रॉयस'ची जोरदार चर्चा

लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता-

राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना विषाणूत होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ञांशी संवाद साधून संभाव्य तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या उपचाराबाबत त्यांनी चर्चाही केली केली होती.

हेही वाचा: मुंबई अनलॉक करण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात...

विशेष कृती दलात सर्वच स्तरावरील तज्ञांचा समावेश-

लहान मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ञांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

14 सदस्य-

 1. डॉ. सुहास प्रभू (अध्यक्ष)

 2. डॉ. तात्याराव लहाने (सचिव सदस्य)

 3. डॉ. विजय येवले

 4. डॉ.बकुल पारेख

 5. डॉ. बेला वर्मा

 6. डॉ. सुधा राव

 7. डॉ. परमानंद अंदनकर

 8. डॉ. विनय जोशी

 9. डॉ. सुषमा सावे

 10. डॉ. जितेंद्र गव्हाणे

 11. डॉ. प्रमोद जोग

 12. डॉ. आरती किन्नीकर

 13. डॉ. ऋषिकेश ठाकरे

 14. डॉ. आकाश बंग