तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण नगण्य - टास्क फोर्स

तिसऱ्या लाटेत आतापर्यंत शुन्य मृत्यूंची नोंद
child corona
child coronasakal media

मुंबई : जगभरातील अनेक तज्ज्ञांनी कोविडची तिसरी लाट (corona third wave) लहान मुलांसाठी घातक (corona impact on children) ठरेल असे मत व्यक्त केले होते. मात्र, गेल्या 16 दिवसांत मुंबईत असे काहीही घडले नाही. तिसरी लाट सुरू झाली असून गेल्या 16 दिवसांत 0 ते 9 वयोगटातील संक्रमित मुलांच्या संख्येत 5 टक्के आणि 10 ते 19 वयोगटातील संक्रमित मुलांच्या संख्येत 8 टक्के वाढ झाली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून या एकाही मुलाचा (no child death) मृत्यू नोंदवलेला नाही. (Corona third wave little impact on children no death issue says corona task force)

child corona
संभाजीराजे संतापले: रायगडावर ‘मदार मोर्चा’ वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न

याचा अर्थ कोविडचा लहान मुलांवर होण्याचे प्रमाण फार कमी आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ज्या वेगाने वाढत आहे तो सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जेवढ्या वेगाने प्रौढ आणि वृद्ध याला बळी पडत आहेत, त्याच पद्धतीने लहान मुलांमध्येही संसर्ग वाढत आहे. मुंबईतील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या आणि दुस-या लाटेप्रमाणे या वेळीही एकूण रुग्णांमध्ये 10 ते 15 टक्के मुलांचा समावेश असेल.

बालरोग कोविड टास्क फोर्सचे सदस्य आणि बालरोगतज्ञ डॉ. बकुल पारेख म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करेल. प्रौढांची संख्या वाढली, तर मुलांची संख्याही त्याच प्रमाणात वाढेल, परंतु सध्या मुलांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. फक्त कुटुंबातील सदस्यांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे. गर्दीत जास्त फिरु नये, कारण,  घरातील मोठे घराबाहेर जातात आणि मग त्यांच्यापासून मुलांपर्यंत संसर्ग पोहोचतो. त्यामुळे नियमांचे शक्य तितके पालन करा आणि मुलांना पार्क आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका.

child corona
थिएटर बंद होणार?: अमित देशमुख यांनी दिलं उत्तर

10 ते 19 वयोगटातील वाढती संख्या

मुंबईत 19 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत 10 ते 19 वयोगटातील 3,141 किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. म्हणजेच गेल्या 16 दिवसांत दररोज सरासरी 196 किशोरवयीन मुले संसर्गित झाले आहेत. तर, याच कालावधीत 0 ते 9 वयोगटातील 795 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. म्हणजेच गेल्या 16 दिवसांत दररोज सरासरी 49 मुलांना संसर्ग झाला आहे.

मुले गंभीर होत नाही, बरे होण्याचे प्रमाण चांगले

कोविडची तिसरी लाट सुरू झाल्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. प्रौढांच्या प्रमाणात संक्रमित मुले देखील येत आहेत, पण, मुलांमध्ये रोगाची तीव्रता खूपच कमी आहे. त्यांना ना आयसीयूची गरज आहे ना ऑक्सिजनची. मुलांमध्ये तापाची तक्रार असते, दोन ते तीन मुले फ्लूच्या सामान्य औषधांनीही बरे होतात.

डॉ. मुकेश अग्रवाल, प्रमुख, बालरोग विभाग, केईएम

10 दिवस होम क्वारंटाईन

जर मुलांना कोविडचा संसर्ग झालाच, तर नियमांनुसार त्यांना 10 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. मुलांमध्ये गंभीर आजार नसेल, तर संबंधित वॉर्ड वॉर रूमशी बोलून होम आयसोलेशनसाठीही सांगितले जाते. घर लहान असेल आणि आयसोलेशनची व्यवस्था नसेल, तर सध्या मुलांना नायर रुग्णालयात पाठवले जाते.

प्रमुख रुग्णालयांमध्ये 50 खाटांची क्षमता

सध्या महापालिकेच्या सायन, केईएम, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये मुलांसाठी 50 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सध्या अनेक खाटा रिकाम्या आहेत. संक्रमित मुलांची संख्या खूपच कमी आहे.

डॉ. रमेश भारमल, संचालक पालिका रुग्णालये आणि अधिष्ठाता, नायर रुग्णालय

आतापर्यंत 8% मुलांना संसर्ग

मुंबईत 3 जानेवारीपर्यंत 8 लाख 18 हजार 462 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 0 ते 19 वयोगटातील 56 हजार 733 मुलांचा समावेश आहे. म्हणजेच एकूण बाधितांपैकी 8 टक्के बालकांचा यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com