थिएटर बंद होणार?: अमित देशमुख यांनी दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित देशमुख
थिएटर बंद होणार?: अमित देशमुख यांनी दिलं उत्तर

थिएटर बंद होणार?: अमित देशमुख यांनी दिलं उत्तर

ओमीक्रॉन व्हेरियंटनं (Omicron) सगळ्यांची झोप उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे (Covid 19) रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुन्हा एकदा नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रीमंडळासमवेत बैठक पार पडली होती. यावेळी आरोग्यमंत्री (Rajesh Tope) यांनी यापुढील काळामध्ये व्हॅक्सिनेशन अनिवार्य असल्याचा निर्णय जाहीर करत लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. दुसरीकडे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये फेब्रुवारीपर्यत बंद राहणार असल्याचे सांगितले. यानंतर आता मनोरंजन विश्वावर पुन्हा निर्बंध येणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यात बुस्टर डोसबाबत मोहीम सुरू करण्यात येणार आहे. शिवाय, रुग्णालयाच्या आवारात आयसोलेशन न करता इतर ठिकाणी देखील आयसोलेशनचा विचार करण्याचा आमचा विचार आहे. रुग्णसेवेत हलगर्जीपणा होणार नाही, याची देखील आम्ही काळजी घेत आहोत. दरम्यान, आयसीएमआरबाबत देखील माहिती घेण्यात आली असून दुसऱ्या लाटेत ज्या सूचना होत्या, त्या सूचना या लाटेत देखील देण्यात आल्या आहेत. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती मंत्री महोदय यावेळी देणार आहेत, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.

दोन वर्षांनंतर मोठ्या काळानं थिएटर सुरु झाले होते. मात्र ओमीक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता त्यावर आता पुन्हा मोठा निर्णय होणार असल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यावर मंत्री अमित देशमुख (Maharashtra Minister Amit Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अजूनतरी थिएटर बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र येणाऱ्या काळात परिस्थिती पाहता त्याबाबत योग्य ती भूमिका घेतली जाईल. सध्याची ओमीक्रॉनचा प्रभाव वाढला आहे. त्यादृष्टीनं प्रशासनानं वेगानं पावलं उचायला सुरुवात केली आहे. मात्र लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं विचार करायचा झाल्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये त्याबाबत चर्चा केली जाणार आहे. याविषयी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे देशमुख (Maharashtra Minister Amit Deshmukh) यांनी सांगितले.

हेही वाचा: राज्य सरकारनं थांबवलं जीनोम सिक्वेन्सिंग; सर्वाधिक रुग्ण ओमिक्रॉनचेच?

गेल्या काही दिवसांपासून ओमीक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. आता रुग्णवाढीचा दर तिपटीनं वाढताना दिसून आला आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री टोपे यांनी काळजी व्यक्त केली आहे. येत्या दिवसांत व्हॅक्सिनेशन अनिवार्य करणं काळाची गरज असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले असून केंद्रीय पातळीवरुन देखील लवकरच त्याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: नांदेड : दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top