मोठी बातमी - सर्व शासकीय कार्यालयं पुढील ७ दिवस राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

मुंबई - जगभरात कोरोना फोफावलाय. अशात महाराष्ट्रात देखील कोरोनाची प्रचंड दहशत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जातायत. सरकारकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जातायत. याचाच भाग मानून मुंबई पुण्या सारख्या शहरांमध्ये कलम १४४  जमावबंदी लागू करण्यात आलीये. अशात १८९७ च्या एपिडेमिक ऍक्ट नुसार कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज अत्यंत महत्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडतेय. अशात मुंबईतही सर्वात जास्त गर्दीच्या लोकल ट्रेन्स बंद करण्यावर निर्णय घेण्यात येऊ शकतो. 

मोठी बातमी - १०० टक्के 'वर्क फ्रॉम होम'ला कॉर्पोरेट सेक्टरचा होकार; CSR फंडातून होणार सरकारला मदत

महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयं राहणार बंद 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार कडून महत्वाचे निर्णय घेण्यात येतायत. आज कॅबिनेटची बैठक पार पडतेय. अशात महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयं पुढील ७ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत असतात. अशात सरकारी कार्यालयांमधून कोरोना फैलावू नये म्हणून सरकारकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार असल्याचं समजतंय. 

मोठी बातमी - कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !

प्लॅटफॉर्म तिकीट १० वरून ५० वर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द  

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवीन निर्णयानुसार आता सर्व स्टेशन वरील प्लॅटफॉर्म तिकिट रुपये १० वरून रुपये ५० करण्यात आलंय. याचसोबत महाराष्ट्रातून विशेष करून मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या २३ लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आलाय आहेत. 

corona threat all government offices will be closed for next seven days

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona threat all government offices will be closed for next seven days