esakal | 18 वर्षांखालील बालकांचा मृत्युदर फक्त 0.02 टक्के; 5 मुलांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

child corona

18 वर्षांखालील बालकांचा मृत्युदर फक्त 0.02 टक्के; 5 मुलांचा मृत्यू

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (corona third wave) संकेत मिळू लागले आहे. 15 ऑगस्टनंतर 300 च्या खाली गेलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून पालिकेने (bmc) मुंबईत बुधवारी दिवसभरात 500 हून अधिक रुग्णांची (corona patients) नोंद केली. त्यामुळे, आता पालिका अलर्ट (bmc on alert) मोडवर असून जास्तीत जास्त तयारी केली जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना (children corona) जास्त त्रास होईल असे वारंवार सांगितले जात आहे. पण, पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेतील लहान मुलांच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार लहान मुलांमध्ये कोरोनातून होणाऱ्या मृत्यूंचे (corona deaths) प्रमाण नगण्य आहे.

हेही वाचा: कोरोनामुक्त नागरिकांच्या सांधेदुखी, श्वसनविकारांमध्ये वाढ

पहिल्या लाटेत 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या एकूण 40 लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, तेव्हा कोविड मृत्यूचा दर हा  0.3%  एवढा होता. दुसऱ्या लाटेत म्हणजेच फेब्रुवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंत एकूण 05 लहान मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, हा मृत्यू दर  0.02% एवढा आहे. त्यामुळे, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत जर तिसऱ्या लाटेत लहान मुलांचे कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले तरी त्यातून मृत्यू होण्याचे प्रमाण फारच कमी असेल पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 पहिल्या लाटेत एकूण  0-18 ते वयोगटापर्यंत 14,442  लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. त्याचे प्रमाण 5 टक्के होते. तर, दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण दुप्पट होऊन  28,058  लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला त्याचे प्रमाण 7% एवढे आहे. पालिकेच्या या आकेडवारीनुसार संसर्गाचे प्रमाण दुप्पट जरी झाले असले तरी मृत्यूंची आकडेवारीही अगदीच नगण्य आहे.

हेही वाचा: महापालिकेच्या 'या' रुग्णालयांत 22 हजार एलपीएम क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट

 25 टक्के ऑक्सिजन बेड्सची गरज

 राज्याच्या बालरोग टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभू यांनी सांगितले की, लहान मुलांच्या उपचारांसाठी 25 टक्के ऑक्सिजन बेड्सची गरज आहे. तसेच, 10 टक्के आयसीयू आणि पीआयसीयू बेड्स लागतील. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये फक्त 10 टक्केच संक्रमण होते. मुलांना आतापर्यंत लसीकरण झालेले नाही. पण, मास्किंग, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर पाळून हा आजार टाळू शकतो. औषधांचा साठा लागेल. डॉक्टरांचे प्रशिक्षण  आणि पीआयसीयूच्या डॉक्टरांचे प्रशिक्षण सुरू आहे. मुलासोबत एक पालक राहण्याची सोय केली आहे. 

लक्षणे-

ताप, सर्दी, खोकला, 90 ते 95 टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे

हायपोक्सिया, शिंका न येणे, नाक न वाहणे, पोट दुखणे, वास न येणे, चव न लागणे

अंगावर रॅशेस येणे, चट्टे येणे.

श्वासाची लक्षणे वाढणे  

डोळे आणि ओठ लाल होणे

एम आयएस - सी ( मल्टिसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम)

loading image
go to top