चिंताजनक ! महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या २४ तासात पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळालाय. गेल्या २४ तासात आणखी १० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होतोय का, महाराष्ट्र स्टेज २ वरून स्टेज ३ वर जातोय का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यास आता नक्कीच वाव निर्माण होतोय. याला कारण देखील असंच आहे. कारण दिवसागणिक महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या २४ तासात पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळालाय. गेल्या २४ तासात आणखी १० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यातील सहा मुंबईतील तर चार पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आदर आकडेवारी दिनांक २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतची आहे

मोठी बातमी -  अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...

कोरोनामुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू

केवळ कोरोनाबाधितांचा आकडा वाढत नाहीये तर महाराष्ट्रात आज कोरोनामुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झालाय. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी PTI  या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिलीये. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात या  नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा २ वर गेलाय.     

मोठी बातमी - महाविद्यालयाची वसतिगृहे 'क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू

'क्वारंटाईनचा स्टॅम्प' हातावर आणि लोकं रस्त्यांवर  

गेल्या काही दिवसात अनेकांना प्रशासनाकडून 'होम क्वारंटाईन'मध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. अशातही अनेकांकडून याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाही. काल महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील CSMT  स्टेशनची पाहणी केली. अशात त्यांना स्टेशनवर तब्ब्ल १६ 'होम क्वारंटाईन'चा शिक्का मारलेले नागरिक पाहायला मिळेलेत. त्यामुळे होम क्वारंटाईन केलेले नागरिक काळजी घेत नसल्याचं स्पष्ट होतंय.   

( नोट : वरील आकडेवारी दिनांक २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतची आहे)

 

corona update maharashtra records second corona death covid19 positive case count goes on 74

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update maharashtra records second corona death covid19 positive case count goes on 74