esakal | दिलासादायक! मुंबईत दिवसभरात 10,097 रुग्णांची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

corona mumbai

दिलासादायक! मुंबईत दिवसभरात 10,097 रुग्णांची कोरोनावर मात

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- मुंबईत गुरुवारी 10,097 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 4,54,311 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 85,494 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुरुवारी 49 मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. तर रुग्णसंख्या वाढली असून आज 8217 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,53,159 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा 85,494 हजारांवर आला आहे. आज दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 12 हजार 189 वर पोहोचला आहे. मृत झालेल्यापैकी 26 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 29 पुरुष तर 20 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 14 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 31 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

हेही वाचा: "म्हणून राज्यात कोरोना पुन्हा वाढला"; उद्धव ठाकरेंची कबुली

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.64 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 42 दिवसांवर आला आहे. आतापर्यंत 48,01,219 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत 95 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1,100 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 28,295 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 1,125 करण्यात आले.

जी उत्तर मध्ये आज 258 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 21,608 झाली आहे. धारावीत आज 57 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 5896 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 102 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 7814 झाली आहे. माहीम मध्ये 99 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 7898 इतके रुग्ण झाले आहेत.