क्वारंटाईन करणाऱ्यांच्या हातावर मारणार शिक्का; कोरोना संशयितांना ३ कॅटेगरीमध्ये विभागणार

क्वारंटाईन करणाऱ्यांच्या हातावर मारणार शिक्का; कोरोना संशयितांना ३ कॅटेगरीमध्ये विभागणार

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा (दिनांक १६ दुपारी ४.०० पर्यंत) ३८ वर गेलाय. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचा कोरोनासंदर्भात आढावा घेतला. कोरोनाच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि आरोग्यविभागाची ही मॅरेथॉन बैठक तब्बल 3 तास सुरु होती.

या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील आरोग्य विभागांना अनेक सूचना केल्यात. या बैठकीत सर्व जिल्ह्याना SDRF मार्फत निधी पुरवला जाणार असल्याचं म्हटलंय. यातील मोठ्या कमिशन हेड्सना १५ कोटी तर लहान कमिशन हेड्सना प्रत्येकी ५ कोटींचा निधी दिला जाणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. 

काय म्हणालेत राजेश टोपे : 

  • महाराष्ट्रातील सर्व शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना शाळांना आणि कुलगुरूंना करण्यात आल्यात. 
  • महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायती आणि महानगर पालिकांमध्ये निवडणूक येऊ घातल्यात. अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात याव्यात असं सरकारकडून निवडणूक आयोगाला कळवण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीये. 
  • महाराष्ट्रात परदेशातून येणाऱ्या इन्फेक्टड देशांच्या यादीत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये दुबई, सौदी आणि USA चा देशांचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे आता दहा देशातून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्यात येईल. 
  • महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णाचं किंवा संशयितांचं तीन विभागात वर्गीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये A, B आणि C अशा तीन विभागात हे वर्गीकरण करण्यात येणार आहे. 

काय आहे A कॅटेगरी : या कॅटेगरीत ज्यांना कोरोना आहे  हे लगेच निदर्शनास आलंय अशाना A कॅटेगरीत ठेवण्यात येणार आहे.

काय आहे B कॅटेगरी: वय वर्ष साठ वरील वयोवृद्ध आणि डायबिटीस किंवा हायपर टेन्शन असणाऱ्यांना आणि कोरोना संशयित लक्षणं असणार्याना B कॅटेगरीमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे

काय आहे C कॅटेगरी : C कॅटेगरीमध्ये तरुणांना ठेवण्यात येणार आहे.

होम क्वारंटाईन करणाऱ्यांच्या हातावर शिक्का : 

ज्यांना घरात क्वारंटाईन करण्यात येणार आहे अशा नागरिकांच्या हातावर एक शिक्का मारण्यात येणार आहे. यामुळे अशी माणसं जर कुठे फिरत असतील तर त्याची माहिती इतरांना होऊ शकणार आहे.   

रेल्वेला स्वच्छतेच्या सूचना : 

रेल्वेतून अनेकजण कायम प्रवास करत असतात. अशात रेल्वेची देखील सफाई दिवसातून दोनदा करण्यात यावी, अशा सूचना करण्यात आली आहे. 

corona updates people who are asked for home quarantine will have stamp on hand

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com