उच्चभ्रू वस्तीत कोरोना; मलबार हिल परिसरातील अख्खीच्या अख्खी इमारत सील

coronavirus
coronavirus

मुंबई: मुंबईतील चाळी, झोपडपट्ट्यांमधून पसरणारा कोरोना विषाणू आता मलबार हिल या उच्चभ्रू भागात पोहोचला आहे. मागील सात दिवसांत कोरोनाचे 21 हून अधिक रुग्ण सापडल्यामुळे तेथील 'तान्ही हाईट्स' इमारत महापालिकेने सील केली असून, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

मलबार हिल परिसरातील नेपीयन्सी रोडवरील 'तान्ही हाईट्स' इमारतीमध्ये घरकाम करणाऱ्या 19 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. वाहनचालक आणि सुरक्षा रक्षकांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे अनेक जणांना संसर्ग झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी महापालिकेने इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती डी प्रभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. 

बाधा झालेल्या 21 जणांना कोरोना केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सोसायटीतील सार्वजनिक शौचालयाचे दिवसातून चार ते सहा वेळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना संबंधितांना महापालिकेने दिल्या आहेत. त्यासाठी सोसायटीची तयारी होईपर्यंत हे काम महापालिका करणार आहे. दरम्यान, सोसायटीतील सर्व रहिवाशांची तपासणी करण्यात आली आहे. अशी तपासणी नियमितपणे करण्याची सूचना दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Corona in the upper brow; Tanhi Heights building on Malabar Hill sealed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com