esakal | खासगी रुग्णालय करणार मोफत लसीकरण; रहिवाशांसाठी सीएसआर निधीचा वापर | corona vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

खासगी रुग्णालय करणार मोफत लसीकरण; रहिवाशांसाठी सीएसआर निधीचा वापर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील लस लाभार्थींची (corona vaccination) संख्या मोठी असून दोन्ही डोस घेतल्यास हर्ड इम्युनिटी (heart immunity) वाढण्यास मदत होईल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी (doctors) बांधल्याने खासगी रुग्णालये (private hospitals) आता झोपडपट्टीमध्ये मोफत लस टोचण्यास पुढे सरसावत आहेत. त्यासाठी मदतीचा हात पुढे करणार असल्याचे खासगी रुग्णालयाचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी (Gautam bhansali) यांनी सांगितले.

हेही वाचा: सलग चौथ्या दिवशीही मुंबईत इंधनाची दरवाढ; पेट्रोल 24 तर डिझेल 32 पैशांनी वाढले

लस उपलब्ध न झाल्यास पालिका लसीकरण केंद्रे सातत्याने बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे गरीब लाभार्थींना लशीसाठी वाट पाहावी लागत आहे. दोन डोसशिवाय लोकल प्रवास करू न शकणारेही मोठ्या संख्येने आहेत. दोन लशींतील अंतराची मर्यादाही खूप दिवसांची असल्याने प्रतीक्षा गंभीर होत आहे. दुसऱ्या डोसचा कालावधी पूर्ण होत आला आहे त्यांना लस तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच आता वेळ, प्रतिकारशक्ती आणि पैसा वाचवण्यासाठी खासगी रुग्णालये पुढे सरसावली आहेत. त्याबाबत बोलताना डॉ. भन्साळी यांनी सांगितले, की लशीसाठी भन्साळी फाऊंडेशनसोबत इतर सामाजिक संघटनांनी सहकार्य करणार असल्याचे कळवले आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर त्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

लशीच्या जागृतीसाठी विद्यार्थ्यांची मदत

मुंबईतील झोपडपट्ट्यांतील पालिकांच्या लसीकरण केंद्रांत लस देण्यात येईल. स्थानिक सामाजिक संघटनांची मदत घेण्यात येईल. शिवाय सोमवार (ता. ४) पासून शाळा सुरू होत असल्याने लसीकरणाच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यातून नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व सांगितले जाणार आहे, असे डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.

loading image
go to top