देशात लसीकरण करण्यात महाराष्ट्र अव्वल; गाठला ६० लाखांचा टप्पा

देशात लसीकरण करण्यात महाराष्ट्र अव्वल; गाठला ६० लाखांचा टप्पा

राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. परंतु, त्यासोबतच लसीकरणाची मोहीमदेखील तितक्याच वेगाने राबवली जात असल्याचं दिसून येत आहे.  महाराष्ट्रात आतापर्यंत ६२ लाख ०९ हजार ३३७ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक लसीकरण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे.
आतापर्यंत देशात ६ कोटी ५१ लाख १७ हजार ८९६ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर, दुसरीकडे उत्तर प्रदेश सारख्या बड्या राज्यात अवघ्या  ६ लाख ९८ हजार ८९९ लाभार्थ्यांचे लसीकरण पार पडले आहे. 

दरम्यान, देशात महाराष्ट्र हे ६ मिलियन (६२ लाख ०९ हजार ३३७) एवढे लसीकरण करणारे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्राहुन दुप्पट लोकसंख्येचे उत्तर प्रदेश हे अद्याप लसीकरणाच्या उद्दिष्टापासून फार दूर असल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे. तर, महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान आणि गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. 

कोणत्या राज्यात किती लाभार्थ्यांचे लसीकरण - 

अंदमान निकोबार - २२  हजार ०८८ ,आंध्रप्रदेश- २६  लाख ०५ हजार १६९, अरुणाचल प्रदेश- ८५ हजार ८८९, आसाम- १०  लाख ४८ हजार ९७४, बिहार- २८ लाख ३४ हजार १३८, चंदीगड- ७७ हजार ५८१, छत्तीसगड- १९ लाख ४२ हजार १०५, दादरा नगर हवेली-१३  हजार ५२४, दीव दमण-१४ हजार ५४२, दिल्ली-१२ लाख ६५ हजार ६५२, गोवा-१ लाख १५ हजार ७५०, गुजरात-५७ लाख १७४, हरियाणा- १५  लाख ९१ हजार ५९९, हिमाचल प्रदेश- ५ लाख ३२ हजार ०५३, जम्मू काश्मीर- ८ लाख ०३ हजार ८२४ , झारखंड- १५ लाख ९६ हजार ४३३ , कर्नाटक-३८ लाख ११ हजार ००७ , केरळ- ३४ लाख १ हजार ९१८ ,लडाख- ४६ हजार ०१० , लक्षद्वीप- ६ हजार ९५९ , मध्यप्रदेश- ३३ लाख ५६ हजार ६६६ , महाराष्ट्र- ६२ लाख ०९ हजार ३३७ ,मनिपूर- १ लाख २० हजार ८३८ ,मेघालय-१ लाख १ हजार ४७६ ,मिझोराम- ६६ हजार ६६६ ,नागालँड- ८७ हजार २४७ ,ओडिशा- २४ लाख ११ हजार ०२१ ,पॉडेचेरी- ७४ हजार १६५ ,पंजाब- ८ लाख ४२ हजार ४४८ ,राजस्थान-५७ लाख २१ हजार ३१२ ,सिक्कीम -७३ हजार ७४१ ,तमिळनाडू- ३० लाख ३१ हजार ६३१ ,तेलंगणा- १२ लाख ९५ हजार ८१४ ,त्रिपूरा- ६ लाख ९७ हजार ३४६ ,उत्तर प्रदेश- ५३ लाख ९८ हजार ६८४ ,उत्तराखंड-६ लाख ९८ हजार ८९९ ,पश्चिम बंगाल- ५२  लाख ३० हजार १६६
संपादन - शर्वरी जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com