दुसऱ्या डोसनंतर मेडिकलचा विद्यार्थी कोरोनाबाधित, सायन रुग्णालयातील घटना

दुसऱ्या डोसनंतर मेडिकलचा विद्यार्थी कोरोनाबाधित, सायन रुग्णालयातील घटना

मुंबई: लस टोचल्यानंतर स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन सतत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. 16 जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर सायन रुग्णालयातील मेडिकल विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांला मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. 

मुंबईत अशी दोन किंवा तीन प्रकरणे घडली आहेत जिथे लस घेतल्यानंतरही व्यक्तीला कोरोनाचा त्रास झाला आहे. नुकताच पालिकेच्या सायन रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाला असल्याचे आढळले आहे. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस 22 जानेवारीला तर दुसरा डोस 19 फेब्रुवारीला घेण्यात आला. 27 फेब्रुवारीला त्याची तब्येत खालावली आणि तपासणी दरम्यान तो पुन्हा पॉझिटिव्ह आढळला. सध्या त्याला उपचारासाठी सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले आहे, तेथे त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पहिल्या दिवशी इतक्या वृद्धांनी घेतली लस
 
सोमवारपासून सर्व केंद्रांवर लसीसाठी वृद्ध लोकांची मोठी गर्दी जमली आहे. मात्र काल कोविन पोर्टलमध्ये उद्भवलेल्या समस्या आणि पालिकेच्या काही केंद्रांमध्ये व्यवस्थेच्या अभावामुळे अनेक जणांना अडचणींचा सामना करावा लागला. 

कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध झाल्यानंतर कालपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पालिकेच्या 5 आणि खाजगी 3 अशा एकूण 8 ठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या लसीकरण मोहीमेत 45 ते 59 वयोपर्यत सोमवारी 260 आणि  60 वर्षांवरील 1,722  अशा एकूण 1,982 लाभार्थ्यांना लस टोचण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 

आतापर्यंत सव्वादोन लाखांवर लसीकरण

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सोमवारी बी. के. सी जंबो कोविड केंद्र, मुलुंड जंबो कोविड सेंटर, नेस्को जंबो कोविड सेंटर गोरेगाव, सेव्हन हिल रुग्णालय, अंधेरी, दहिसर जंबो केंद्र आणि खासगी खासगी रुग्णालयांतील एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर, के. जे. सोमय्या वैदयकीय महाविदयालय, शीव  आणि एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी या ठिकाणी लसीकरण करण्यात आले.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Vaccination medical student tested positive after taking the second dose Sion Hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com