मुंबईसाठी पुढील 15 दिवस महत्वाचे ठरणार, लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी

भाग्यश्री भुवड
Sunday, 21 February 2021

मुंबईत शनिवारी लसीकरणाला जोरदार प्रतिसाद मिळालेला दिसून आला आहे. जे लक्ष्य शनिवारी पालिकेने ठेवले त्याच्यापेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले आहे.

मुंबई: मुंबईत शनिवारी लसीकरणाला जोरदार प्रतिसाद मिळालेला दिसून आला आहे. जे लक्ष्य शनिवारी पालिकेने ठेवले त्याच्यापेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, असे जरी असले तरी मुंबईसाठी पुढील पंधरा दिवस महत्वाचे ठरणार असून लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे. 

महापालिकेने शनिवारी 10 हजार 500 आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांना कोरोना लस देण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र त्याउलट मुंबईत काल लसीकरणाला वाढलेला प्रतिसाद पाहायला मिळाला.  शनिवारी ठरलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त 13 हजार 914 आरोग्यसेवा आणि फ्रंट-लाइन कामगारांना लसीकरण केले गेले. 

पालिकेने शनिवारी 3 हजार  आरोग्यसेवा आणि 7 हजार 500 फ्रंट लाइन कामगारांना लसी देण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र 4 हजार 444 आरोग्य सेवा कामगार आणि 9 हजार 470 फ्रंटलाइन कामगारांना शनिवारी कोरोना लस दिली गेली. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या आकड्यांच्या अंदाजानुसार, शनिवारी मुंबईत आरोग्यसेवेच्या 148 टक्के आणि 130  टक्के फ्रंटलाइन कामगारांना कोरोना लस दिली गेली. मात्र 4 हजार 444 मधील  2 हजार 640 आरोग्य सेवकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. 

हेही वाचा- इंधनवाढीचा भडका! भविष्यातही इंधन दरवाढ सुरुच राहणार, अर्थतज्ज्ञांचा इशारा

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, लसीकरण वाढवण्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे सर्व विभागांशी योग्य समन्वय, दुसरे कारण म्हणजे आता लोकांना हे समजले आहे की कोरोनापासून बचाव करण्याचा एकमात्र मार्ग लस आहे आणि तिसरे कारण म्हणजे शनिवार आणि रविवार असल्याने मोठ्या संख्येने लोक लसीकरण केंद्रांवर पोहोचले.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Vaccination Mumbai Saturday strong response More than the target bmc


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Vaccination Mumbai Saturday strong response More than the target bmc