Corona Vaccination: आता खासगी रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी होणार कोरोना लसीकरण  

Corona Vaccination: आता खासगी रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी होणार कोरोना लसीकरण   

मुंबई:  खासगी रुग्णालयात त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडूनही मार्गदर्शक तत्व आली आहेत, असे आज महानगर पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

खासगी रुग्णालयांनी लसीकरणाची परवानगी देण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार राज्य सरकारने मार्गदर्शक तत्व तयार केली आहेत. ठरलेल्या सुविधा आणि यंत्रणा खासगी रुग्णालयात असल्यास त्यांना लसीकरणाची परवानगी देण्यात येईल असे महापालिका अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यापासून नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लागेल. मात्र, सध्याच्या परिस्थितीत खासगी रुग्णालयांना फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. सध्या महानगर पालिकेच्या 21 केंद्रावर लसीकरण सुरु आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून 1 मार्च पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील नागरिक आणि दिर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी महानगर पालिकेने तयारी सुरु केली आहे. त्यानंतर 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लागणार आहे. अशा वेळी खासगी रुग्णालयांची मदत घेता येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. खासगी रुग्णालयातील लसीकरणासाठी किती दर असेल याबाबत साशंकता आहे. ‘खासगी रुग्णालयातील लसीचा दर केंद्र सरकारकडून ठरवला जाईल’असेही अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 

 केरळ मध्ये कोविडचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेने केरळ मधून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची चाचणी सुरु केली आहे. या प्रवाशांची विमानतळावर कोविड चाचणी केली जात आहे. या चाचणीत कोविडची बाधा असल्याचे आढळल्यास नियमानुसार उपचार केले जातात. जर, कोविडची बाधा नसेल तर घरी जाण्याची परवानगी दिली जाते, असेही काकाणी यांनी सांगितले. सध्या मुंबई विमानतळावर गोवा, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या भागातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाते. त्यात आता केरळ राज्याचा समावेश करण्यात आला आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Vaccination Private hospitals allowed Corona vaccinate their staff

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com