esakal | हाफकिन लसीचे काम प्रगती पथावर; लस उपलब्ध होण्यास 6 महिन्यांची प्रतीक्षा | Haffkine vaccine
sakal

बोलून बातमी शोधा

haffkin

हाफकिन लसीचे काम प्रगती पथावर; लस उपलब्ध होण्यास 6 महिन्यांची प्रतीक्षा

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना लसीचे (Corona vaccine) देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्राने हैदराबादस्थित लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकसोबत (Bharat biotech) तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्थेअंतर्गत लस उत्पादनासाठी (vaccine production) हाफकिन बायोफार्माला (haffkine biopharma) मान्यता दिली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, ही लस पुढील सहा महिन्यांत म्हणजेच मे महिन्यापर्यंत बाजारात दाखल होईल. तसेच, पहिल्या महिन्यातच लसीचे 1 करोड डोस (one crore dose) बाजारात उपलब्ध होतील.

हेही वाचा: शिवसेना सत्तेत असताना मराठी भाषेची पीछेहाट

एप्रिल महिन्यात, केंद्र सरकारने राज्याच्या हाफकीन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी मंजुरी दिली होती. या मंजुरीनंतर हाफकीनने लस निर्मितीच्या प्रक्रियेत जोर धरला. इथले कर्मचारी शिवाय, इतर स्टाफ दिवसरात्र या कामासाठी लागले आहेत. हाफकीनचे उत्पादन महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार म्हणाले की, लस निर्मितीसाठी सेफ्टी लॅबची गरज आहे.

या सेफ्टी लॅबच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली आहे.  बीएसएल लॅबचे बांधकाम जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. यानंतर, या प्रयोगशाळेची चाचणी एका महिन्यासाठी म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत केली जाईल. ही प्रयोगशाळा आयसीएमआर आणि हाफकिनच्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली बांधली जाईल. संपूर्ण महिनाभर प्रयोगशाळेच्या होणार्या चाचणीमध्ये शास्त्रज्ञ एसओपी अंतर्गत प्रयोगशाळा बांधली गेली आहे की नाही हे तपासतील. लस उत्पादनात प्रयोगशाळा किती सुरक्षित आहे याचीही शास्त्रज्ञ चौकशी करतील.

हेही वाचा: पेन्शनर्सना दिवाळीपूर्वी थकबाकी; राजीव जलोटा यांचे आश्वासन

शंकरवार यांच्या मते, लॅबच्या बांधणीनंतर फेब्रुवारीमध्ये लसीच्या तीन बॅच तयार होतील. लसीची तीन महिने स्थिरतेच्या गुणधर्मासाठी चाचणी केली जाईल. या स्थिरता चाचणीत लसीमध्ये कोणताही दोष आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. या तीन महिन्यांच्या चाचणीत परिणाम सकारात्मक आल्यास एप्रिलमध्ये लसीचे उत्पादन सुरू होईल आणि मे महिन्यात लस बाजारात उपलब्ध  होईल.

बीएसएल 3 काय आहे? 

बीएसएल 3 हे एक सुरक्षा मानक आहे जे अशा सुविधांना लागू होते जिथे कामामध्ये जंतूंचा समावेश असतो, ज्यामुळे श्वास घेतल्याने शरीराला गंभीर आजार होऊ शकतो. शंकरवार म्हणाले की, 'सार्वजनिक क्षेत्रातील मालमत्तेचा वापर करून लस निर्मितीची क्षमता वाढवून आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिमा राबवल्या जाणे महत्वाचे आहे.

loading image
go to top