esakal | ब्रेकिंग : SBI मागोमाग 'या' चार बँका पुढील तीन महिने EMI घेणार नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : SBI मागोमाग 'या' चार बँका पुढील तीन महिने EMI घेणार नाहीत

या सर्व बँकांनी कर्जाचे EMI घेणार नसल्याचं सांगितलंय, क्रेडिट कार्डच्या बिलांबाबत अद्याप निर्णय झालेलया नाही.

ब्रेकिंग : SBI मागोमाग 'या' चार बँका पुढील तीन महिने EMI घेणार नाहीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाठोपाठ आता भारतातातील चार मोठ्या बँकांनी त्यांच्या कर्जधारकांना दिलासा दिला आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्व बँकांना पुढील तीन महिने EMI घेऊ नका असा सल्ला दिला होता. अशात आता भारतातील IDBI बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांनी पुढील तीन महिने कर्जदारांकडून कर्जाचा हफ्ता न घेण्याचा निर्णय घेतलाय. बँकांच्या या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळालाय. 

या सर्व बँकांनी कर्जाचे  EMI घेणार नसल्याचं सांगितलंय, क्रेडिट कार्डच्या बिलांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही ...

एप्रिल फुलचे मेसेजेस यंदा नकोच कारण कोरोना वायरसच्या संकटांशी लढताना थट्टेला स्थान नाही

एक एप्रिलपासून नवीन महिना सुरु होतो. अशात सर्व सामान्य नागरिकांकडून संपूर्ण महिन्याचं बजेट सुरवातीलाच ठरत असतं. यामध्ये आपले EMI, महिन्याचा खर्च आणि सेव्हिंग ठरत असतं. दरम्यान या महिन्यात लॉकडाऊनमुळे अनेकांना सध्या घरी बसावं लागतंय, अनेकांचं कामकाज ठप्प आहे. अशात अनेकांना आपल्या EMI ची काळजी आहे. कामकाज बंद असल्याने वेळेवर पगार होणार की नाही याबाबत नोकरदारांकडून चिंता व्यक्त केली जातेय. दर महिन्याला जसा EMI  बदल रिमाइंडर येतो तास या महिण्यात देखील आल्याने ग्राहकांमध्ये धास्ती आहे. 

BMC कर्मचाऱ्यांसाठी नगरसेविकेने तळले खमंग वडे...

अशात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मागोमाग IDBI बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांनी पुढील तीन महिने कर्जाचा हप्ता पुढे ढकलला आहे. म्हणजेच जर तुमचं कर्ज १५ वर्षांचं असेल तर ते आता तीन महिने पुढे म्हणजे पंधरा वर्ष ३ महिने सुरु राहील. दरम्यानच्या काळात बँकांकडून कर्जाचा हप्ता आकाराला गेला नसल्याने तुमच्या आमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये कोणताही बदल होणार नाही. 

या बँकांमागोमाग आता इतर बँक देखील EMI स्थगितीचा बद्दल निर्णय घेऊ शकतात, तशी घोषणा होऊ शकते. 

corona virus crisis these banks will not take EMIS for next three months

loading image
go to top