BMC कर्मचाऱ्यांसाठी नगरसेविकेने तळले खमंग वडे...

BMC कर्मचाऱ्यांसाठी नगरसेविकेने तळले खमंग वडे...

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्यासाठीच अविरतपणे झटणाऱ्या डॉक्टर्स, पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला जातोय. आपल्याला जमेल त्या मार्गाने सर्वजण अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी मदत करण्याचा प्रयत्न करतायत. अशात मुंबईत एका नगरसेविकेने हटक्या प्रद्धतीने BMC कर्मचाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलाय.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० + झालाय, १० लोकांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात २३ मार्चपासून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलंय. संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती कितीही बिकट असली तरी या सगळ्यातून आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि पत्रकारांना काही सुट्टी नाहीये.

पोलिस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, बीएमसीचे कर्मचारी हे आपल्या जीवाची चिंता न करता आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहे. बरेचदा त्यांना उपाशी राहून ड्युटी करावी लागत आहे. सरकारनं आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरवल्या आहेत.

लॉकडाऊन असल्यामुळे अनेक गरजू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र आता मुंबईच्या शीव-माटुंगा इथल्या नगरसेविका आणि दक्षिण मध्य मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्षांनी बीएमसी कर्मचाऱ्यांना नाश्ता पुरवण्याची आणि गरजू लोकांना जेवण पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी नाश्त्यासाठी बनविण्यात येत असलेले बटाटे वडे हे खुद्द नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी तळले. राजश्री शिरवडकर या बटाटे वडे तळत असतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये त्या तोडांला मास्क लावून दिसत आहेत. हा त्यांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

नगरसेविका राजश्री शिरवडकर आणि राजेश शिरवडकर यांनी गरजू आणि गरीब लोकांच्या जेवण्याची सोय केल्यामुळे आणि उपाशी भर उन्हात कर्तव्य बजावत असलेले पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या नाश्त्याची सोय केल्यामुळे या दोघांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

fight against corona BMC corporator rajashree shirvadkar made vada pav for workers 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com