
मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळी रुग्ण संख्या जरी वाढत असली तरीदेखील मृत्यूदराचं प्रमाण मात्र कमी आहे. त्याचसोबत गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांची संख्यादेखील कमी असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या मुंबईमध्ये एकूण सक्रीय रुग्णांपैकी केवळ दीड टक्के रुग्ण गंभीरावस्थेत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईत दररोज ४५ हजारांपेक्षा जास्त लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे.
८० टक्के रुग्ण लक्षणविरहित-
मुंबईत सक्रिय ४५ हजार,१४० रुग्णांच्या तुलनेत मुंबईत ८० टक्के रुग्ण लक्षणांशिवाय आहेत. पालिका डॅश बोर्डनुसार मुंबईत लक्षणे नसलेले ३६ हजार,५३५ आणि लक्षणे असलेले ८ हजार ४९ रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या सुरु असलेल्या या चाचणीत सुमारे १२ ते १४ टक्के रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. यामध्ये नवीन कोरोना रूग्णांची संख्या सुमारे ७ हजारांवर पोहोचली आहे. तर मुंबईत नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या ४५ टक्क्यांवर आहे. यासह, सक्रिय रूग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २९ मार्चपर्यंत मुंबईत, ४५ हजार,१४० सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ५५६ रुग्ण म्हणजेच दीड टक्के रुग्ण गंभीर आहेत.
बेड क्षमता वाढवणार-
मुंबईतील वाढती रूग्ण पाहता महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये बेड वाढवण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त २२६९ बेड खासगी रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यापैकी ३६० बेड आयसीयूमध्ये असतील अशी माहिती आयुक्तांनी दिली. त्याशिवाय, या आठवड्यात जंबो केंद्रांत १५०० बेड्स वाढवण्यात येणार असून रिक्त बेडची संख्या वाढून ७ हजारांपर्यंत होईल.
संपादन - शर्वरी जोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.