esakal | नाईट कर्फ्यूचा फज्जा उडतोय? दारुची पार्सल सेवा सुरुच
sakal

बोलून बातमी शोधा

नाईट कर्फ्यूचा फज्जा उडतोय? दारुची पार्सल सेवा सुरुच

मुंबईसह इतर महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यूचा फज्जा उडत असल्याचं चित्र समोर आलं आहे.

नाईट कर्फ्यूचा फज्जा उडतोय? दारुची पार्सल सेवा सुरुच

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू आहे. 5 जानेवारीपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. मात्र मुंबईसह इतर महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यूचा फज्जा उडत असल्याचं चित्र समोर आलं आहे. एका वृत्तवाहिनीनं केलेल्या रिअॅलिटी चेकमधून ही घटना उघडकीस आली आहे. 

राज्य सरकारनं मुंबईसह इतर पालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यूची घोषणा केली. मात्र काही नागरिक नाईट कर्फ्यूला गांभीर्यानं घेत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर रात्री एक वाजण्याच्या सुमारास बार उघडून दारुविक्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर खाण्याचे पार्सल देणंही सुरु आहे. नाईट कर्फ्यू झाल्यानंतर सर्व काही बंद असतानाही सकाळी ३ ते ४ वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु असल्याची बाब आढळून आली आहे.  नाईट कर्फ्यूचे नियम लागू करताना यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं. मात्र दारुविक्रीची पार्सल सर्रास सुरु आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. या बैठकीत नाईट कर्फ्यूबाबत निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा-   कोविडच्या नव्या रुपाचा तरुणांना जास्त धोका असणार?

Corona Virus mumbai night curfew break rules alcohol delivery

loading image