धक्कादायक : पीएमसी मार्केट कोरोनाच्या विळख्यात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत कोरोन रुग्णांचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे हे मार्केट शहरातील कोरोनाचा नवीन "हॉटस्पॉट' होण्याची शक्‍यता आहे. सुरूवातीला मार्केटमधील गर्दी नियंत्रणात आणण्यात सरकारी यंत्रणांना आलेले अपयश हा आजार फोफावण्यामागे एक महत्त्वाचे कारण समजले जात आहे.

नवी मुंबई  : आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून परिचित असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेतील (एपीएमसी) तब्बल 15 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून व्यापाऱ्यांपाठोपाठ त्यांच्या संपर्कात कुटुंबिय आणि कर्मचाऱ्यांनाही या आजाराची लागण होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

हे वाचा : एसटीचे कामगार धोक्यात

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत कोरोन रुग्णांचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे हे मार्केट शहरातील कोरोनाचा नवीन "हॉटस्पॉट' होण्याची शक्‍यता आहे. सुरूवातीला मार्केटमधील गर्दी नियंत्रणात आणण्यात सरकारी यंत्रणांना आलेले अपयश हा आजार फोफावण्यामागे एक महत्त्वाचे कारण समजले जात आहे. 
सुरुवातीला मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी योग्य ती खबरदारी घेतली असती तर धान्य मार्केट आणि भाजीपाला, फळ मार्केटपर्यंत झळ पोहचली नसती, असे सांगण्यात येते. 

सध्या एपीएमसीतील 15 बड्या व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या सोबत रात्रंदिवसभर संपर्कात आलेले 30 नातेवाईक आणि कर्मचारी या आजाराने ग्रस्त आहेत. आता तर किरकोळमध्ये भाजी आणि हातगाडीवर फळे विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

हे वाचा : फ्लेमिंगोंची संख्या वा़ढली
  
फसलेले प्रयत्न 
नवी मुंबईतील एपीएमसी ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रासहीत परराज्यातून येते शेतमाल येतो. या गर्दीमुळे याठिकाणी कोरोना फोफावण्याची दाट शक्‍यतेमुळे अनेकदा व्यापारी वर्गाने व्यापार बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हा प्रयत्न हाणून पाडला. गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी रांगा लावणे, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे, थर्मल स्क्रनिगे अशा अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात आला. परंतु तोपर्यंत कोरोनाने अनेक जणांना विळख्यात घेतल्याने हे प्रयत्न तोकडे ठरले आहेत. 
  
एपीएमसी मार्केट अनभिज्ञ 
गेल्या 15 दिवसांत एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस नवे रुग्ण सापडत आहेत. परंतु या रूग्णांबाबतची माहिती एपीमएसी मार्केट प्रशासनाला महापालिकेकडून मिळत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये कोणा-कोणाला लागण आहे. तसेच कोणी संशयित आहे याबाबत एपीएमसी मार्केट प्रशासन अनभिज्ञ आहे. महापालिका प्रशासनाकडून रुग्णांबाबतची माहिती मिळावी यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचे प्रशासक अनिल चव्हाण यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus patients increased in APMC