डहाणूत नाकामजुरांवर उपासमारीची वेळ; रोजगारासाठी शोधाशोध 

नारायण पाटील
Saturday, 3 October 2020

कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही उद्योग सुरू करण्यास व्यापारी धजावत नाहीत. त्यामुळे डहाणू तालुक्‍यात कोरोना काळात बांधकामासारखे सर्व प्रकारचे व्यवसाय बंद पडल्याने नाक्‍या-नाक्‍यावर कामासाठी उभ्या राहणाऱ्या मजुरांना मागणी नसल्याने शेकडो नाका मजुरांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. 

डहाणू  ः कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही उद्योग सुरू करण्यास व्यापारी धजावत नाहीत. त्यामुळे डहाणू तालुक्‍यात कोरोना काळात बांधकामासारखे सर्व प्रकारचे व्यवसाय बंद पडल्याने नाक्‍या-नाक्‍यावर कामासाठी उभ्या राहणाऱ्या मजुरांना मागणी नसल्याने शेकडो नाका मजुरांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. 

महत्त्वाची बातमी :  बाबरी पतनाआधी माधव गोडबोलेंनी आमच्या कानावर काही गोष्टी घातल्या होत्या, पण त्यांचं मत मागे पडलं? कारण सांगितलं शरद पवारांनी

कोरोना संसर्गामुळे गेल्या सात महिन्यांपासून या मजुरांच्या हाताला काम नाही. डहाणू तालुक्‍यातील डहाणू, वाणगाव, चिंचणी, चारोटी, अशा ठिकाणच्या बाजारपेठाच्या नाक्‍यावर, बेरोजगार तरुण कामाच्या शोधात जमा होत असतात. तेथून गरजू मालक त्यांना मालवाहक मोटारीवर हमाली, बांधकाम बिगारी, रेती, खडी, मुरूम मातीच्या ट्रकवर हमाली आदी कामासाठी त्यांना नेत असतात. मात्र कोरोना संसर्गामुळे बाजारपेठेत मंदी आल्याने ही कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नाका मजुरांच्या हाताला काम नसल्याने या मजुरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. 

महत्त्वाची बातमी: सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सने CBI कडे पाठवला अहवाल

डहाणू वाणगाव रेल्वेस्थानक आणि बस स्थानकात शेकडो नाका मजूर येऊन दररोज कामासाठी उभे राहत असतात. तेथून ते प्लम्पिंग, रंगारी, सफाई कामगार, लाकूड कटाई, भात कापणे, गवत कापणी, मासेमारी, फर्निचर, वीटभट्टी अशा विविध कामासाठी जात असतात. त्यातून त्यांना चांगला मोबदला मिळतो. मात्र कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिकांसाठी रेल्वे सेवा बंद असल्याने त्यांना शहरात जाता येत नाही. 

कोट... 
डहाणूत केंद्र सरकारने 20 जून 1991 च्या अधिसूचनेनुसार, कोणताही उद्योग उभारण्यास बंदी घातलेली असल्याने आम्हाला कायमस्वरूपी काम मिळत नाही. त्यामुळे आम्हाला काम मिळवण्यासाठी शहराच्या ठिकाणी जाऊन, नाक्‍यावर उभे राहावे लागते. पण मंदीमुळे कामाला कोणी बोलवत नसल्याने घरी परतावे लागत आहे. 
- कृष्णा पटारा, मजूर. 

corona virus stop work unskilled workrs in dahanu

(संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus stop work unskilled workrs in dahanu