वर्क फ्रॉम होम करताय आणि एकीकडे मुलगाच रडतोय? 'या' वर्क फ्रॉम होमच्या भारी टिप्स

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

मुंबई : जगात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. कोरोनामुळे जगभरात  पेक्षा जास्त जास्त लोकांचा जीव गेला आहे. भारतातही कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयं, सर्व ऑफिसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफिस बंद ठेवून शक्य अनेकांना आता घरून काम करू द्यावं असं राज्य सरकारकडून सांगण्यात येतंय. 

मुंबई : जगात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. कोरोनामुळे जगभरात  पेक्षा जास्त जास्त लोकांचा जीव गेला आहे. भारतातही कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयं, सर्व ऑफिसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफिस बंद ठेवून शक्य अनेकांना आता घरून काम करू द्यावं असं राज्य सरकारकडून सांगण्यात येतंय. 

हेही वाचा: पहिली ते आठवीपर्यंतच्या वार्षिक परीक्षा रद्द;नववी आणि अकरावीच्या परीक्षा 'या' तारखेनंतर.. 

'वर्क फ्रॉम होम' म्हंटल तर तुम्हाला वाटेल हे सोपं आहे. घरी विश्रांतीही घेता येईल आणि कामही होईल. मात्र हे वाटतं तितकं सोपं नाही. घरून काम करण्यात अनेक अडथळे तुमच्यासमोर निर्माण होतात. मात्र आता चिंता करू नका आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरी राहूनही प्रभावी काम करू शकता. ज्यामुळे तुम्ही कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकाल आणि तुमचं काम थांबणार नाही. 

काय आहेत 'वर्क फ्रॉम होम'च्या टिप्स:

(१) काम करण्याची योग्य जागा निवडा:

वर्क फ्रॉम होमसाठी तुम्हाला पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या घरात तुमच्या कामाची जागा. घरून काम करत असताना तुमच्या कामाची जागा ठरवणं महत्वाचं आहे. तुमच्या घरी स्टडी रूम किंवा गेस्ट रूम असेल तर तुम्ही त्या खोलीला तुमचं ऑफिस म्हणून वापरू शकता. तुमचं घर लहान असेल तर घरातली कोणतीही शांत जागा निवडा आणि तिथून तुम्ही काम करू शकता. 

(२) काम करताना विचलित होऊ नका:

घरून काम करताना तुमचं लक्ष विचलित होतं याच प्रमुख कारण म्हणजे तुमची लहान मुलं आणि कुटुंब. कोरोना व्हायरसमुळे शाळांना सुट्टी दिली आहे त्यामुळे तुमची लहान मुलं घरीच असतील. तुम्ही काम करताना तुमच्या लहान मुलांमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं. मात्र आपल्या कुटुंबातल्या लोकांना तसंच लहान मुलांना आपल्या कामाच्या जागेवर येऊ देऊ नका. यामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही. 

हेही वाचा: शाब्बास महाराष्ट्र! पाच कोरोना पॉझिटिव्ह झालेत निगेटिव्ह,लवकरच जाणार घरी... 

(३) कामांची यादी करा:

तुम्हाला आज कोणती कामं करायची आहेत याची एक यादी दररोज सकाळी तयार करा. या कामांना किती वेळ लागेल यानुसार तुमचं वेळापत्रक तयार करा. यामुळे तुम्ही घरी राहून कामही करू शकाल तसंच आपल्या कुटुंबाला वेळही देऊ शकाल. 

(४) विश्रांती घेत काम करा:

वर्क फ्रॉम होम म्हणजे एकाच जागेवर बसून कित्येक तास काम करणं अशी अनेकांची धारणा असते. मात्र तुम्हाला तुमच्या सोयीनुसार काम करण्याची मुभा वर्क फ्रॉम होममध्ये मिळते. म्हणून तुमच्या कामामध्ये काही वेळ विश्रांती घ्या. सोशल मीडियावर थोडावेळ घालवा आणि काही वेळानं परत कामाला सुरुवात करा. यामुळे तुम्ही ताण न घेता नीट काम करू शकाल.

(५) ऑफिसच्या लोकांच्या संपर्कात राहा:

घरून काम करत असताना तुमच्या ऑफिसच्या लोकांसोबत सतत संपर्कात राहा. कामात अडथळा आला तर त्यांची मदत घ्या. तुम्ही काय काम करत आहेत यांची माहिती सतत त्यांना देत राहा. यामुळे तुम्हाला नेहमी प्रमाणे ऑफिसमध्ये काम करत असल्याचा अनुभव येईल आणि तुमचं काम लवकर होईल. 

मोठी बातमी: ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील ४ मोठी शहरं राहणार बंद-उद्धव ठाकरे 

(६) इंटरनेट कमी पडू देऊ नका:
 
वर्क फ्रॉम होम करत असताना तुम्हाला गरजेची  सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट. ऑफिसमध्ये वायफाय किंवा लॅनच्या माध्यमातून तुम्हाला इंटरनेट मिळतं मात्र घरून काम करताना ऑफिस एवढा इंटरनेटचा स्पीड मिळू शकत नाही. त्यामुळे वर्क फ्रॉम होमसाठी तुमच्याकडे पुरेसं फास्ट इंटरनेट असायला हवं, यासाठी तुम्ही वायफाय लावून घ्या. ज्यामुळे तुमच्या ऑफिसच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये किंवा तुमच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही.

(७) आत्मविश्वासानं काम करा: 

घरून काम करत असताना अनेकदा तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. मात्र असा विचार करू नका. कोरोना व्हायरसमुळे तुमच्यासोबत अनेकजण घरून काम करत आहेत. तुम्हाला जे काम करायचं आहे ते आत्मविश्वासानं करा.    

त्यामुळे या टिप्सचं पालन करा आणि वर्क फ्रॉम होम करून कोरोनापासून स्वतःचा आणि तुमच्या कुटुंबाचा बचाव करा.     

corona virus threat if you are working from home then these are few tips for you


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus threat if you are working from home then these are few tips for you