वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईत कोरोनाचे 714 नवे रुग्ण, 9 रुग्णांचा मृत्यू

वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईत कोरोनाचे 714 नवे रुग्ण, 9 रुग्णांचा मृत्यू

मुंबई:  मुंबईत आज 714 नवे रुग्ण सापडले आहे. एकूण रुग्णसंख्या 2 लाख 93 हजार 436 झाली आहे. आज 980 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 73 हजार 444 रूग्ण बरे होऊन घरी गेले. आज दिवसभरात 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा 11 हजार 116 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 364 दिवसांवर गेला आहे. तर 30 डिसेंबरपर्यंत एकूण 23 लाख 56 हजार 465 कोविड चाचण्या करण्यात आल्या.  23 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.21 इतका आहे.

मुंबईत आज मृत झालेल्या  7 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 6 पुरुष आणि 3 महिलेचा समावेश आहे. मृत झालेल्यांपैकी सर्व 9 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते.

मुंबईत 278 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 2 हजार 517 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 3 हजार 395 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणाऱ्यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 410 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona virus updates mumbai 2020 last day 714 new Cases patients 9 died

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com