कोरोना योद्धा डॉक्‍टरचा वाढदिवशी अपघाती मृत्यू 

प्रकाश परांजपे
Thursday, 1 October 2020

वाढदिवशीच कोरोना योद्धा म्हणून सन्मान झालेल्या डॉक्टरचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर (जि. ठाणे) येथे गुरुवारी सकाळी घडली. डॉ. आकाश साहू (35) असे या डॉक्टरचे नाव असून, ते ईगतपुरी (जि. नाशिक) येथे राहत होते. अपघातानंतर चालक कंटेनर सोडून फरार झाला असून, शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे.

शहापूर : कोरोना योद्धा म्हणून सन्मान झालेल्या डॉक्टरचा वाढदिवशीच दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर (जि. ठाणे) येथे गुरुवारी सकाळी घडली. डॉ. आकाश साहू (35) असे या डॉक्टरचे नाव असून, ते ईगतपुरी (जि. नाशिक) येथे राहत होते. अपघातानंतर चालक कंटेनर सोडून फरार झाला असून, शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे.

क्लिक करा : कल्याण-डोंबिवलीत दुभाजकांना गवताचा वेढा; अपघाताची शक्यता

राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असताना, या काळात रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आदींचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान केला जातो. कोरोना काळात ठाणे येथील कौशल्य मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात सेवा बजावणारे डॉ. आकाश साहू यांचाही 'कोव्हिड योद्धा' म्हणून सन्मान करण्यात आला होता.

क्लिक करा : कोरोना काळात दुरावा! प्रवासी वाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांची गाण्यातून साद

डोंबिवली येथे स्वतःचे क्लिनिक असलेले डॉ. साहू गुरुवारी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावरून ईगतपुरी येथील घरी दुचाकीने जात होते. त्यांची दुचाकी शहापूर येथील जोंधळे महाविद्यालयासमोर आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात डॉ. साहू यांचा मृत्यू झाला. डॉ. साहू यांचा चुलतभाऊ पंकज परदेशी याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला; मात्र तो शहापूर पोलिसांनी घेतला व झालेल्या दुर्दैवी घटनेची माहिती दिल्याने त्यांना धक्काच बसला. 

------------------------
(संपादन : प्रणीत पवार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona warrior doctor's accidental death on his birthday