मुंबईत पुन्हा कोरोनाचे थैमान; गेल्या 24 तासात 2371 रुग्णांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मिलिंद तांबे
Thursday, 10 September 2020

मुंबईत आज तब्बल 2,371 नवे रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,63,115 झाली आहे. रूग्णवाढीचा दरही 0.98 वरून 1.14 टक्क्यावर पोहोचला आहे.

मुंबई : मुंबईत आज तब्बल 2,371 नवे रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,63,115 झाली आहे. रूग्णवाढीचा दरही 0.98 वरून 1.14 टक्क्यावर पोहोचला आहे. तर, आज 38 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,020 वर पोहोचला आहे. मुंबईत आज 1,367 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 79 टक्के आहे.

कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; संजय राऊतांचा सूर नरमला

मुंबईत आज मृत्यूंपैकी 31 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 26 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 38 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षांहून कमी होते.  29 रुग्णांचे वय 60 हून अधिक होते. तर, 8 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते.
दरम्यान, मुंबईत आज 1,367 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,28,112 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 61 दिवसांवर गेला आहे. मुंबईत 9 सप्टेंबरपर्यंत एकूण 8,72,155  कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. 

कंगनाच्या बंगल्यावर आकसाने कारवाई नाही; मुंबई महापालिकेचे न्यायालयात स्पष्टीकरण

14,889 व्यक्ती संशयित
मुंबईत 544 वस्त्या आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 7,528 असून गेल्या 24 तासांत रुग्णांच्या संपर्कात आलेले 14,889 संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronain Mumbai 2371 patients added