शहापुरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

प्रकाश परांजपे
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या शहापूर तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. 67 वर्षीय हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी सांगितले असून, याबाबत गुरुवारी रात्रीपासून आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहापूर (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या शहापूर तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. 67 वर्षीय हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी सांगितले असून, याबाबत गुरुवारी रात्रीपासून आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्लिक करा : इथे कोरोनाला नाही दिला थारा...

शहपुरात राहणाऱ्या ६७ वर्षीय व्यक्तीला दम्याचा त्रास होत असल्याने त्याला प्रथम शहापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित रुग्णाला ठाणे येथील होरिझन या रुग्णालयात 7 एप्रिलला दाखल करण्यात आले. या रुग्णाची ठाणे शहराच्या पश्चिम भागातील एका खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

क्लिक करा : कोरोनाबाधितांसाठी ठाण्यात डॉक्टरांची फौज

दरम्यान, खबरदारी म्हणून संबंधित इमारत व परिसर सील करण्यात आला असून इमारतीमधील रहिवाशांना बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाचे पथकाने संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णाच्या नातेवाईकांची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्रीपासून शहापुरात याबाबत अफवांचे पीक आले असून, अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन तहसीलदार सूर्यवंशी यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's first patient found in Shahapur