कोरोनाबाधितांसाठी ठाण्यात डॉक्‍टरांची फौज 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

कोरोना विषाणूचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ठाणे पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी शुक्रवारी 12 खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची तात्पुरत्या मानधनावर नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर डॉ. शैलजा पिल्लई यांची ऑन कॉल तज्ज्ञ डॉक्‍टर म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती जून 2020 पर्यंत अथवा कोरोनाची साथ संपेपर्यंत करण्यात आली आहे. 

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ठाणे पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी शुक्रवारी 12 खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची तात्पुरत्या मानधनावर नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर डॉ. शैलजा पिल्लई यांची ऑन कॉल तज्ज्ञ डॉक्‍टर म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती जून 2020 पर्यंत अथवा कोरोनाची साथ संपेपर्यंत करण्यात आली आहे. 

क्लिक करा : काळजी घ्या ठाणेकरांनो...शहरातील कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपार 

कोरोनाबाधित रूग्णांवर उपचारासाठी सफायर हॉस्पिटल, हॉटेल लेरिडा, हॉटेल जिंजर या दोन हॉटेलसह भाईंदरपाडा येथील डी बिल्डींगमध्ये जागा देण्यात आली आहे. त्यानुसार हॉटेल लेरिडा, हॉटेल जिंजर तसेच भाईंदरपाडा डी बिल्डींग येथे लक्षणे नसलेल्या बाधीत रूग्णांना डॉक्‍टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. 

या सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्‍यकता लक्षात घेऊन पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी तातडीची बाब म्हणून 12 बीएएमएस खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची 40 हजार रूपये इतक्‍या एकत्रित मानधनावर नियुक्ती केली आहे. नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी तीन सत्रांत काम करणार आहेत. सकाळी सात ते दुपारी तीन, दुपारी तीन ते रात्री अकरा तसेच रात्री अकरा ते सकाळी सात या तिन्ही सत्रामध्ये प्रत्येकी एक खाजगी वैद्यकीय व्यावसायिकामार्फत कामकाज पाहण्यात येणार आहे. 

 क्लिक करा : भर दुपारी रानडुकराने चिमुकलीवर हल्ला केला पण...

या डॉक्‍टरांची नियुक्ती 
  हॉटेल लेरिडामध्ये डॉ. तेजस थोरात, डॉ. मनीष सिंग, डॉ. आशिष सिंग, डॉ. मुकेश यादव यांची, तर हॉटेल जिंजर येथे डॉ. सौरभ बचाटे, डॉ. संतोष शिंदे, डॉ. जयंत जाधव, डॉ. विनोद सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाईंदरपाडा येथील डी इमारतीमध्ये डॉ. सोनिया इंगळे, डॉ. शैलेश इंगळे, डॉ. समिधा गोरे, डॉ. मधुरा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

रुग्णांची दोन वेळा तपासणी 
   सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या अधिपत्याखाली दाखल केलेल्या रुग्णांना दिवसातून किमान वेळा तपासणी करून आवश्‍यकतेनुसार उपचार करणे आवश्‍यक आहे. तसेच एखादा रुग्ण गंभीर झाल्यास तातडीने डॉ. शैलजा पिल्लई यांच्याशी संपर्क साधून योग्य कार्यवाही करून आवश्‍यक उपचार करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors force in Thane to treat Corona