चिंताजनक बातमी! मुंबईत 'हा' परिसर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 17 June 2020

काही दिवसांपासून आता मुंबई शहरातील या भागापेक्षा मुंबई उपनगरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याचं चित्र समोर आलं आहे.  मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी आणि दहिसर हे प्रभाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागलेत.

मं

मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी आणि वरळीत कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसतोय. आधीपासून धारावी आणि वरळी हे आतापर्यंतचे कोरोनाचे हॉटस्पॉट होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आता मुंबई शहरातील या भागापेक्षा मुंबई उपनगरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याचं चित्र समोर आलं आहे.  मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी आणि दहिसर हे प्रभाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागलेत.

मंत्रालयातले कर्मचारीच भाजपला माहिती पुरवतात; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप...

मुंबईतील के पूर्व हा अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी परिसर आहे. या परिसरात 70 टक्के भाग झोपडपट्टीचा असून हा भाग दाटीवाटीचा आहे. तर अंधेरी पूर्व भागात कोरोना रुग्णांच्या संख्येने 4 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आता या परिसरात 4076 कोरोना रुग्ण आहेत. अंधेरी, जोगेश्वरी भागात विमानतळ, एमआयडीसी असल्यानं कोरोनाच्या संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. आता पर्यंत धारावी-दादर-माहिमचा समावेश असलेला मुंबईतील मोठा हॉटस्पॉट जी उत्तर विभागात सर्वाधिक रुग्ण असल्याने प्रथम क्रमांकावर होता.

विशेष म्हणजे, मुंबईतील कोरोनाचे सुरुवातीचे हॉटस्पॉट असलेल्या धारावी, वरळी, कुर्ला, भायखळा या प्रभागातही अजून 4000 रुग्ण संख्या नाही. इतक्या झपाट्याने अंधेरी पूर्वेत कोरोनाग्रस्त वाढलेत.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या 'या' मागणीला केराची टोपली; केंद्र सरकारकडून दूरदर्शनची वेळ मिळेना

नवा हॉटस्पॉट बनण्याचं हे आहे कारण

के पूर्व हा मुंबईतला तिसरा मोठा वॉर्ड आहे. ज्या ठिकाणी 70 टक्के परिसर झोपडपट्टीनं व्यापलेला आहे. नियमाप्रमाणे तेथील हाय रिस्क कॉन्टॅक्टचं विलगीकरण करण्यात येतंय. या ठिकाणी वास्तव्यास असलेले अनेक रुग्ण त्यावश्यक सेवांमधील म्हणजे एमआयडीसी, सिप्झ, एअरपोर्ट, मरोळ पोलिस कॅम्प, सेव्हन हिल्स आणि ट्रॉमा केअर हॉस्पिटल या ठिकाणचे आहेत. हा वॉर्ड एअरपोर्टच्या जवळचा येतो. त्यामुळे वंदे भारत मिशन अंतर्गत जे प्रवासी आले ते याच वॉर्डातील हॉटेल्स मध्ये राहिलेत. 

ऑनलाइन शिक्षणामुळे यंदा टॅब, सेकंडहॅन्ड मोबाइलला सुगीचे दिवस

दहिसरमध्येही कोरोनाचा फैलाव

आर उत्तर वॉर्ड म्हणजे दहिसरमध्ये कोरोना संक्रमणाचं सर्वात कमी प्रमाण होतं. आता हे चित्र बदलताना दिसतं आहे. या प्रभागात 13 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होते आहे. नव्या रुग्णवाढीचा दर 5.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this is Corona's new hotspot in Mumbai