ऑनलाइन शिक्षणामुळे यंदा टॅब, सेकंडहॅन्ड मोबाइलला सुगीचे दिवस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

शाळाही ऑनलाइन सुरू होत असल्याने पालक टॅब आणि सेकंड हॅन्ड मोबाइल खरेदी करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळांचे वर्ग ऑनलाइन भरविण्यात येत आहेत. त्यामुळे पालकांकडून टॅब आणि सेकंड हॅन्ड मोबाईलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने अनेकांना खरेदीच्या प्रतीक्षेत रहावे लागत आहे. लॉकडाऊननंतर नोकरदार वर्ग घरातून फोन, लॅपटॉपच्या माध्यमातून काम करत आहे. यातच शाळाही ऑनलाइन सुरू होत असल्याने पालक टॅब आणि सेकंड हॅन्ड मोबाइल खरेदी करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. पण लॉकडाऊननंतर दुकाने खुली होऊ लागली असली, तरी त्यांच्याकडेही पुरेसे साहित्य नसल्याने पालकांची मागणी पूर्ण करण्यात दुकानदारांना अडथळे येत आहेत.

मोठी बातमी : सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर 

मोबाईलऐवजी टॅबला पसंती
टॅब स्वस्त मिळत असल्याने पालक मोबाईलऐवजी टॅबला पसंती देत आहेत. तसेच अनेकांकडे पैसे अधिक नसल्याने ते सेकंडहॅन्ड स्मार्ट फोन खरेदी करत आहेत, असे ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक असोसिएशनचे अध्यक्ष मितेश मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा : वयाच्या ९५ व्या वर्षी जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं वृद्धापकाळाने निधन

लॅपटॉप खरेदीला प्रतिसाद नाही
ऑनलाइन शाळेबरोबरच अनेक खासगी कार्यालयांच्या बैठक ऑनलाइन होत आहेत. त्यामुळेही टॅबची मागणी वाढल्याचे मोदी म्हणाले. लॅपटॉपला काही प्रमाणात मागणी आहे. मात्र तो खर्चिक असल्याने लॅपटॉप खरेदीला प्रतिसाद नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ही हे वाचा : ज्येष्ठ साहित्यिक यशवंत रांजणकर यांचे निधन

यापूर्वी टॅबला अधिक मागणी नव्हती. त्यामुळे दुकानदार खूप कमी प्रमाणात टॅब दुकानात ठेवत होते. आता मागणी अधिक असल्याने ही मागणी पूर्ण करणे लगेच शक्य होत नाही. यापूर्वीच्या खरेदीच्या तुलनेत टॅबची मागणी 60 टक्क्यांनी वाढली आहे. तर सेकंडहँड मोबाइलची मागणीही वाढली आहे.
- मितेश मोदी, अध्यक्ष, ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक असोसिएशन

due to online education, this year is the demand for tab, second hand mobile


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to online education, this year is the demand for tab, second hand mobile