'सिग्नल फ्री मुंबई' प्रोजेक्टला कोरोनाचा स्पीडब्रेकर; कोस्टलरोडलाही मुदतवाढ देण्याचा BMC चा निर्णय

समीर सुर्वे
Sunday, 30 August 2020

सिग्नल फ्री मुंबईला कोव्हिडचा गतीरोधक लागण्याची शक्‍यता आहे. कोस्टल रोड प्रकल्पाला मुदत वाढ देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.

मुंबई : सिग्नल फ्री मुंबईला कोव्हिडचा गतीरोधक लागण्याची शक्‍यता आहे. कोस्टल रोड प्रकल्पाला मुदत वाढ देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. त्यापुढील वांद्रे वर्सोवा सागरी सेतूवरही कोव्हिडच्या लॉकडाऊनचा परिणाम झाल्याची शक्‍यता आहे.मात्र, हा प्रकल्पाचे काम पाच वर्ष चालणार असल्याने लॉकडाऊनचा परीणाम होण्याची शक्‍यता कमी आहे. असे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

वर्सोवापासून वांद्रे पर्यंत एमएसआरडीसी सागरी सेतू बांधत आहे. हा सागरी सेतू वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्यात येणार असून पुढे वरळी ते नरीमन पॉईंट असा कोस्टल रोड मुंबई महानगर पालिका बांधत आहे. कोस्टल रोडचे काम 2018 मध्ये सुरु होऊन ते 2022 पर्यंत पुर्ण करायचे होते. प्रकल्प सुरु झाल्यानंतर 4 वर्षाच्या मुदतीत हे काम पुर्ण करायचे होते. मात्र,प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम डिसेंबर 2019 मध्ये सुरु झाले. हे काम वेग घेत असतानाच लॉकडाऊन मुळे कामाचा वेग मंदावला होता. त्यामुळे या प्रकल्पाला आता मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठेकेदाराकडून देण्यात आला आहे.त्यानुसार पालिकेने मुदतवाढ देण्यात आली आहे. सहा महिन्यांचा अंदाज घेऊन साधारण सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कोस्टल रोडचे बांधकाम करणाऱ्या कंपन्यांकडून मुदतवाढीचा प्रस्ताव आला होता. त्यानुसार त्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे.असे कोस्टल रोडचे प्रमुख अभियंदा निरंजन खानोलकर यांनी सांगितले.

मोठी बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी कुलगुरूंची समिती गठीत; उद्याच सादर करणार अहवाल

कोस्टल रोड बरोबरच पश्‍चिम उपनगरांसाठी महत्वाचा असलेल्या वांद्रे वर्सोवा सागरी सेतूवरही लॉकडाऊनचा परीणाम झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.मात्र,या प्रकल्याची सध्या प्राथमिक कामे सुरु होती.प्रकल्प 5 वर्ष चालणार असल्याने लॉकडाऊनमुळे प्रकल्प लांबेल असे वाटत नाही.असे एमएसआरडीचे सह महाव्यवस्थापक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.

कोस्टल रोड
नरीमन पॉईंट ते वरळी सागरी सेतू पर्यंत
9.9 किलोमिटर
खर्च - 12 हजार 969 कोटी

वर्सोवा वांद्रे सागरी सेतू
17.17 किलो मिटर
खर्च 11 हजार 332 कोटी 82 लाख

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas speedbreaker for Signal Free Mumbai project; BMC decides to extend Coastal Road project