Coronavirus : म्हाडा उभारणार इतक्या हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय, गृहनिर्माण मंत्र्यांनी दिली माहिती

hosptial
hosptial

ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशावेळी पालमंकत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या ग्लोब्लह इम्पॅक्ट हब येथे 1 हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरु आहे. तसेच वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी म्हाडाच्या वतीने 1 हजार बेडचे कोव्हिड रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्याचबरोबर मुंब्य्रात 500 बेडचे आणि कळव्यात 500 बेडसाठी जागेचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज नवीन 100 हून अधिक रुग्ण कोरोनाचे शहरात आढळत आहेत. त्यामुळे आतार्पयत ही संख्या 1 हजार 800 च्या घरात गेली आहे. शहरातील पाच खासगी रुग्णालयातील बेड यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील देखील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आता झोपडपटटी भागात अधिक होऊ लागला आहे. 

त्यात आता येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल अशा काळात रुग्णांचे अधिक हाल होण्याची शक्यता नाकारात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नवीन तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालये सुरु करण्यासाठी शनिवारी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या निवास्थानी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या उपस्थितीत या संदर्भात महत्वाची बैठक झाली. यावेळी म्हाडाच्या वतीने वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी तब्बल 1 हजार बेडचे कोव्हिड रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. त्याचे नियोजन आता युध्द पातळीवर सुरु झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंब्रा आणि कळव्यातही रुग्णालय
कळवा, मुंब्रा भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.  त्या अनुषंगाने आता मुंब्य्रात एका शाळेत 500 बेडचे रुग्णालय उभारण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे. तसेच कळव्यातही 500 बेडचे रुग्णालय सुरु करण्याचा विचार सुरु आहे. मात्र या ठिकाणी जागा उपलब्ध होण्यात समस्या येत आहे. काही मैदानाचा विचार सुरु होता, परंतु पावसाळ्यात रुग्णांचे तेथे हाल होऊ शकतात. त्यामुळे कळव्यात इतर कुठे जागा मिळते का? याचा शोध सुरु असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Coronavirus: MHADA to build 1,000-bed Covid Hospital, Housing Minister

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com