Coronavirus: रवीनाने रेल्वेत अशी घेतली काळजी; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

रवीना टंडनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटला रेल्वे प्रवासावेळी बर्थ स्वच्छ करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रवीनाने तोंडाला मास्क लावला आहे आणि ती रेल्वेने प्रवास करताना दिसत आहे.

मुंबई : देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना सर्व नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. यामध्ये बॉलिवूडही मागे नसून, अभिनेत्री रवीना टंडन हिने रेल्वे प्रवासावेळी तोंडाला मास्क लावून बर्थ स्वच्छ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रवीना टंडनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटला रेल्वे प्रवासावेळी बर्थ स्वच्छ करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रवीनाने तोंडाला मास्क लावला आहे आणि ती रेल्वेने प्रवास करताना दिसत आहे. तुम्ही स्वत:ला कोरोनापासून कशाप्रकारे वाचवू शकता, याबाबत मार्गदर्शन करणारा एक व्हिडीओ रवीनाने शेअर केला आहे.

या मॅसेजमध्ये ती म्हणत आहे, की ट्रेनने प्रवास करताना पहिल्यांदा केबिनला वेट वाईप्स आणि सॅनिटायझरने विषाणूरहित करत आहे, त्यामुळे आम्ही कम्फर्टेबल होऊ. माफीपेक्षा सुरक्षित राहिलेले कधीही चांगले. अत्यावश्यक असल्यावरच प्रवास करा. कृपया स्वत:ला आणि आपल्या आसपासच्या लोकांच्या सुरक्षेला प्रधान्य द्या. किमान 31 मार्चपर्यंत तुम्ही स्वतःचे संरक्षण करून घरातच राहणे पसंत करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus raveena tandon cleaned the entire seat while traveling in the train