CoronaVirus : टीव्ही मालिका, चित्रपटांचे शूटींग 31 मार्चपर्यंत बंद!

CoronaVirus : टीव्ही मालिका, चित्रपटांचे शूटींग 31 मार्चपर्यंत बंद!

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकराने काही गंभीर पाऊले उचलली आहेत. सरकारने मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह, शाळा, कॉलेज, व्यायामशाळा आदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यापाठोपाठ महाराष्ट्रासह भारतभरात सुरू असणाऱ्या टिव्ही मालिका, चित्रपट, जाहिराती आणि वेबसीरिज यांचे चित्रीकरण गुरूवारी, 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय चित्रपट संघटनांनी घेतला आहे

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईज (एफडब्ल्युआईसीई), इंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन (इम्पा), वेस्टर्न इंडिया फिल्म्स प्रोड्युसर असोसिएशन (डब्ल्युआईएफपीए), आईएफपीटीसी आणि गिल्डचे पदाधिकारी यांनी आज (15 मार्च) तातडीची बैठकीत घेण्यात आली. यामध्ये फक्त टिव्ही मालिका, चित्रपट, जाहिराती आणि वेबसीरिज यांचे चित्रीकरण बंद राहण्याबरोबरच पोस्ट प्रोडक्‍शन, सराव (रिहर्सल), संकलन (एडिटिंग), डबिंग हे विभागही बंद राहणार आहेत. याशिवाय देशात किंवा परदेशात कुठेही चित्रीकरण सुरू असल्यास निर्मात्यांना तीन दिवसांत संपूर्ण युनिटची वैद्यकिय तपासणी करून त्यांना लवकरात लवकर बोलावून घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सुरक्षा म्हणून निर्मात्यांनी जिथपर्यंत चित्रीकरण सुरू आहे, तेव्हापर्यंत सर्व युनिटला मास्क आणि सॅनिटायजर्सची व्यवस्था करण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे.

या बैठकीत ऑल इंडिया एम्लॉईज कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लॉईजचे सरचिटणीस अशोक दुबे, फेडरेशनचे मुख्य सल्लागार आणि डायरेक्‍टर असोसिएशनचे अशोक पंडित, इम्पाचे अध्यक्ष टी.पी.अग्रवाल, कार्यकारी सदस्य अभय सिन्हा, सुषमा शिरोमनि, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम शिर्के, आईएफपीटीसीचे जे.डी. मजीठिया, निर्माता टिनू वर्मा, प्रदिप सिंह, आणि गिल्डचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 

आता पंधरा दिवस चित्रीकरण बंद असल्याने चित्रीकरणात सहभागी असलेले स्पॉटबॉय, लाईटमन, मेकअप आर्टिस्ट, असिस्टंट कॅमेरामन आदी दैनंदिन पगारावर काम करणाऱ्यांच्या उदनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

CoronaVirus : TV series, movie shootings close until March 31!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com