esakal | कॉर्पोरेटसाठी बेस्टची प्रिमीयम सर्व्हिस; ताफ्यात 400 नव्या बसेस
sakal

बोलून बातमी शोधा

Best-Buses

कॉर्पोरेटसाठी बेस्टची प्रिमीयम सर्व्हिस; ताफ्यात 400 नव्या बसेस

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई :कॉर्पोरेट कार्यालयातील (Cor[orate office) कर्मचाऱ्यांसह विमान प्रवाशांसाठी (Airplane Commuters) प्रिमीयम सर्व्हिस (premium service) सुरु करण्याचा विचार बेस्ट प्रशासन (BEST Authorities) करत आहे. यासाठी नियोजनाचे काम सुरु आहे. या वर्षा अखेर पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 400 ते 500 नव्या बसेस (New buses) दाखल होणार आहे.अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा (lokesh chandra) यांनी सकाळशी बोलताना दिली.

हेही वाचा: राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर

उत्पन्नवाढीसाठी बेस्ट कडून विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.काही वर्षांपुर्वी पालिका शाळांसाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.आता बेस्ट उपक्रम कॉर्पोरेट कार्यालयांसाठी प्रिमीयम बस सेवा सुरु करण्याचा विचार करत आहे.कॉर्पोरेट कंपन्यां बरोबरच विमानतळावरुन प्रवाशांसाठीही अशा प्रकारची बस सेवा सुरु करण्याचा विचार पुढे आला आहे.

या बसेससाठी मार्ग निश्‍चित करण्यात येतील.ही सुविधा पॉईंट टू पॉईंट असेल.कॉर्पोरेट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेत बससेवा दिली जाणार आहे.असेही लोकेश चंद्रा यांनी सांगितले.विमानतळावरील प्रवाशांसाठीही अशी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेस्टच्या ताफ्यात सध्या 3 हजार 340 बसेस आहेत.तर,आता वर्षाच्या अखेर पर्यंत 450 ते 500 बसेस ताफ्यात दाखल होणार आहे.त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी बसेसची संख्या वाढविणे शक्‍य होणार आहे.असेही महाव्यवस्थापन लोकेश चंद्रा यांनी सांगितले.

अशी असेल प्रिमीयम बस सेवा

-पॉईंट टू पॉईंट सर्विंस

-कार्यालया पासून ठरलेले रेल्वे स्थानक पर्यंत

-रेल्वे स्थानकांपासून कार्यालया पर्यंत

-अथवा कंपनीने ठरवरुन दिलेल्या ठिकाणा पासून कार्यालया पर्यंत

-विमानतळावरुन ठराविक जंक्‍शन अथवा पॉईंट पर्यंत

फायदा काय ?

-कर्मचाऱ्यांना बेस्ट बसेसची प्रतिक्षा करण्याची गरज लागणार नाही.

-ठराविक वेळेत त्यांच्यासाठी बेस्टची बस उपलब्ध असेल.

-विमानतळावर जाण्यासाठी येण्यासाठीही अशा पध्दतीने सुविधा असेल.

loading image
go to top