esakal | कोविड नियमभंगप्रकरणी नगरसेवकास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोविड नियमभंगप्रकरणी नगरसेवकास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : नगरसेवक सुफियान नियाज वणू यांना काल मंगळवारी सहार पोलिसांनी अटक केली. सुफियान यांच्यावर कोविड नियमांचे उल्लघंन केल्याचा आरोप आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महापालिकेच्या के पूर्व वॉर्डमध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून काम करतात. कोविड १९ या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकात ते कार्यरत होते. त्यांची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. विदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करणे, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना क्वारंटाईन करणे याची त्यांच्यावर जबाबदारी होती.

हेही वाचा: सोलापूर : सहा महिन्यांत ७२ हजार परवान्यांचे वाटप

मे महिन्यांत वडाळा येथे राहणारी शविस्ता अकलेकर यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हा प्रकार समजताच तिथे स्थानिक नगरसेवक सुफियान वणू हे गेले होते. यावेळी त्यांनी हॉटेल क्वारंटाईनमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता. तसेच पॉझिटिव्ह असतानाही शविस्ता यांना हॉटेलबाहेर नेले होते. या आरोपांची पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर सुफियान वणू यांच्यावर कोविड नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.

loading image
go to top