शिवसेना भवनात नगरसेवकांची ओळख परेड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेनेच्या नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. राजकीय चर्चा आज करणार नाही. महापौर शिवसेनेचाच होणार असून, लवकरच त्याबाबत बोलू, असे ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांना सांगितले.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच विजयी नगरसेवकांनी "मातोश्री'वर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, अनेक नवे चेहरे असल्याने या नगरसेवकांची एकमेकांना ओळख व्हावी म्हणून आज शिवसेना भवन येथे बैठक बोलवली असल्याचे सांगण्यात आले. या वेळी पक्षाचे 84 नगरसेवक, दोन बंडखोर आणि दोन अपक्ष असे 88 नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीतही युतीबाबात वक्तव्य करणे ठाकरे यांनी टाळले. महापौर निवडणुकीला अद्याप वेळ आहे, तुम्हाला योग्य वेळी सांगू. आता घाई नाही, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आणखी एक अपक्ष नगरसेविका मुमताज खान यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 89 झाली आहे.

Web Title: corporator identity in shivsena bhavan