नगरसेवकांवर टांगती तलवार कायमच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांच्या पात्रतेबाबत १७ मे रोजी कोकण आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत सहा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा अर्ज मनसेने कोकण आयुक्तांकडे केला होता.

तत्कालीन गटनेते दिलीप लांडे यांच्यासह सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशाला आव्हान देत नगरसेवकांना शिवसेनेच्या गटाबरोबर नोंदणीची परवानगी देऊ नये, तसेच पक्षांतरबंदी कायद्यान्वये त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, असे दोन अर्ज मनसेने कोकण विभागीाय आयुक्तांकडे केले होते.

यातील गट नोंदणीच्या आक्षेपाचा अर्ज फेटाळून लावत जानेवारी महिन्यात कोकण आयुक्तांनी गटनोंदणीला परवानगी दिली. त्यानुसार या नगरसेवकांचा शिवसेनेत कायदेशीर प्रवेश झाला. त्यानंतर दिलीप लांडे यांना सुधार समितीसारख्या महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपद मिळाले; मात्र त्यांच्यावरील धोका अद्याप टळलेला नाही.

सहा नगरसेवक
दिलीप लांडे, अश्‍विनी माटेकर, परमेश्‍वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव आणि हर्षला मोरे.

Web Title: Corporator MNS Shivsena Konkan Commissioner Result politics